[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

सोग्रस हायस्कूलचा निकाल ९७.८७% श्रेया नवले प्रथम

यांनी लिहिलेले रावसाहेब जाधव

सोग्रस हायस्कूलचा निकाल ९७.८७%
श्रेया नवले प्रथम

सोग्रस, येथील श्री. अजितदादा पवार माध्यमिक विद्यालयाने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम जपली असून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा २०२४ चा निकाल ९७.८७% लागला आहे. यामध्ये गुणानुक्रमे कु. नवले श्रेया संजय (९१.२०), कु. आहेर गायत्री रामदास (८३.२०), पवार समर्थ सतीश (८२.६०), कु. पवार साक्षी त्रंबक (८०.२०), कासार ओंकार भावराव (७९.६०) या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले आहे.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. उत्तम मुरलीधर गांगुर्डे, उपाध्यक्ष मा. श्री. आंबू रावजी शिंदे, सचिव मा. श्री. प्रशांतदादा भास्करराव बनकर, संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक, मुख्याध्यापक श्री. रावसाहेब खंडेराव जाधव, तसेच पालक व ग्रामस्थांतर्फे अभिनंदन करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक श्री. बोरगुडे बी.आर. थोरमिसे के.एम. गांगुर्डे एस.के. गांगुर्डे एम टी. शिंदे के.बी. देवरे व्ही एच. यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

लेखकाबद्दल

रावसाहेब जाधव

एक टिप्पणी द्या