[masterslider id="2"]
मुख्य बातमी

दुगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी त्र्यंबक सोनवणे

दुगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी त्र्यंबक सोनवणे
व्हा .चेअरमनपदी लताबाई गायकवाड यांची बिनविरोध


चांदवड तालुक्यातील दुगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी त्र्यंबक सोनवणे तर व्हा .चेअरमनपदी लताबाई गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी किशोर भालेराव यांनी पाहिले त्यांना सहाय्य सचिव दीपक शिंदे यांनी केले.

दुगाव सोसायटीच्या रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी त्रंबक केदू सोनवणे तर व्हाईस चेअरमन साठी लताबाई मच्छिंद्र गायकवाड यांचे अर्ज दाखल झाले. छाननी नंतर सदर अर्ज वैद्य ठरल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोन्हींची अनुक्रमे चेअरमन व व्हा .चेअरमन पदी निवड घोषित केली. चेअरमन व व्हा चेअरमन निवडीसाठी बोलवण्यात आलेल्या विशेष सभेत संचालक मंडळ एकनाथ सोनवणे ,भगवान मंडलिक, शंकर सोनवणे, आरिफ शेख, केदु खरात ,दत्तू आहेर ,कांतीलाल जाधव ,नारायण सोनवणे, रत्नाबाई सोनवणे हे संचालक उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व व्हा .चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थितीत पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोनवणे ,माजी सभापती यू . के .आहेर, सरपंच संजय सोनवणे, पोलीस पाटील रवींद्र सोनवणे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, सुभाष टेलर, माजी चेअरमन रावसाहेब सोनवणे यांच्या सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या