*जिल्हा परिषद नाशिकच्या “सुपर ५०” उपक्रमाअंतर्गत मनमाड महाविद्यालयाच्या कु. कांबळे समीक्षा व कु. अहिरे पल्लवी या विद्यार्थिनींची निवड*


*मनमाड:* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील इयत्ता ११वी विज्ञान शाखेतील कु. कांबळे समीक्षा ज्ञानेश्वर व कु. अहिरे पल्लवी गोरखनाथ या विद्यार्थिनींची जिल्हा परिषद नाशिकच्या “सुपर ५०” उपक्रमांतर्गत निवड झाली आहे. कू.अहिरे पल्लवी या विद्यार्थिनीची “BARTI” अंतर्गत JEE साठी निवड झाली असून शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेली आहे. मागील वर्षात जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेला नाविन्यपूर्ण “सुपर ५०” हा उपक्रम यावर्षी देखील जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी जिल्हा परिषद नाशिक च्या वतीने सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षासाठी “सुपर ५०” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ११वीच्या नियमित अभ्यासक्रमाबरोबर JEE व NEET या व्यवसायिक पात्रता प्रवेश परीक्षांसाठी निशुल्क निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर उपक्रमांतर्गत निवड झालेल्या या विद्यार्थिनींच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री विठ्ठल फंड, शैक्षणिक पर्यवेक्षक श्री दिलीप कातकाडे, श्रीमती ए एस पाटील, प्रा. आय.एम. खान, प्रा. एस. डी. देसले, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

