[masterslider id="2"]
मुख्य बातमी

केदानाना आहेर यांची आध्यात्मिक बांधिलकी 170 भजनी मंडळांना केले साहित्य वाटप. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन संपन्न

केदानाना आहेर यांची आध्यात्मिक बांधिलकी 170 भजनी मंडळांना केले साहित्य वाटप.
रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन संपन्न

राजकारण म्हटलं की पक्षाचे मिळावे, सभा, कार्यकर्ते मेळावे अशा राजकीय दृष्टिकोनातून उपक्रम साजरे होत असतात. मात्र यापेक्षा थोडा वेगळा विचार नाफेडचे संचालक केदा नाना आहेर यांनी केला. गावागावात महाराष्ट्राच्या संस्कृतीची जोपासना करणाऱ्या व वारकरी संप्रदायाची पताका सतत तेवत ठेवणाऱ्या भजनी मंडळांना भजनासाठी लागणारे साहित्य भेट देत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. चांदवड देवळा तालुक्यातील 170 गावातील भजनी मंडळाला एक मृदंग व दहा टाळ भेट देऊन महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृतीची जोपासना त्यांनी केली आहे. त्याबद्दल चांदवड व देवळा या दोन्ही तालुक्यातील वारकऱ्यांच्या वतीने केदानाना आहेर यांच्या या उपक्रमाबद्दल आशीर्वाद रुपीसदिच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र ही संतांची व वारकरी विचारांची भूमी आहे. आज संस्कृती फक्त वारकऱ्यांनी जपली आहे. हिंदू धर्मात भजनी मंडळाचे योगदान मोठ आहे. वारकरी संप्रदायाचे काही देण लागतो या पवित्र उद्देशाने चांदवड व देवळा तालुक्यातील सर्व भजनी मंडळांना भजनासाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आल्याचे प्रतिपादन नाफेडचे संचालक केदानाना आहेर यांनी तालुक्यातील मंगरूळ येथील रेणुका इव्हेंट हॉल येथे कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.


भजनी मंडळांना भजनी साहित्य वाटप व संत पूजन सोहळा मंगरूळ येथील रेणुका इव्हेंट हॉल येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रसिद्ध रामायणाचार्य हभप. रामराव महाराज ढोक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.व्यासपीठावर संजय महाराज धोंडगे, पुंडलिक खडकतळेकर, एस कुमार देवळा, तुकाराम परसूलकर, अक्षय महाराज आहेर, बापू देवरे, विलास ढोमसे, अशोक भोसले, सुनिल शेलार, प्रभाकर ठाकरे, अनिल ठोके, संजय पाचोरकर योगेश शेळके, ह .भ. प दत्तात्रय राऊत, ह .भ .प संजय महाराज शिंदे , प्रशांत ठाकरे, योगेश आहेर ,प्रशांत वैद्य, प्रकाश देवढे, नानू आहेर, भगवान खताळ, भागवतअण्णा जाधव ,सचिन निकम, डॉ. प्रदीप परदेशी, प्रशांत आहेर, सोपान बोरंगुडे, ज्ञानेश्वर पगार, आदी उपस्थित होते.प्रास्ताविक संजय महाराज धोंडगे यांनी केले.

रामरावजी महाराज ढोक यांचे कीर्तन झाले. धनवान व्यक्ती आपल्या धनाचा उपयोग जर संत साहित्य व संस्कृतीच्या वाढीसाठी करीत असेल तर संत महात्म्याच्या कृपेला पात्र ठरतो. त्यांचे फळ नक्कीच त्याला मिळते.राज्य सरकारने गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. कलियुगात अहिल्यादेवी होळकर या पुण्यश्लोक म्हणून जन्माला आल्या. अहमदनगरचे अहिल्यानगर झाले. लोहगाव विमानतळाचे नाव जगतगुरु तुकाराम महाराज विमानतळ करण्यात आले. अशा विचारांच्या लोकांना देव आणि संत सदैव विजयाचा आशीर्वाद देतात, असे प्रतिपादन ढोक महाराज यांनी केले.
प्रतिक्रिया
केदानाना आहेर :-

संत महात्मा चे आशीर्वाद हे मी माझे भाग्य समजतो. संप्रदायिक परिवारामध्ये जे काम करतात समाजामध्ये संस्कार देण्याचे काम करतात ही सगळी भजनी मंडळी गावामध्ये सप्ताह होतो त्यामुळे लहान मुलांमध्ये संस्कार घडतात. तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. अशा परिस्थितीत सांप्रदायिक कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे.हे पुण्य पदरात पाडून घ्यायचे यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मी हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आज शून्यातून मोठा झाला एक गरीब कुटुंबातील व्यक्ती सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती आणि परिवारात वाढलेला जो समाजासाठी काहीतरी देणं लागतो. राजकारण करत असताना समाजा प्रतीचे जे भावना आहे ती प्रामाणिकपणाची आहे. विधानसभेची उमेदवारी करणार आहे याच्यामध्ये काहीतरी हेतू आहे असे काहीजणे बोलत असतील . मात्र यामध्ये कोणताही किंतू -परंतु हेतू नाही. माझ्याकडे जो ही व्यक्ती आला असेल दवाखान्यासाठी, सामजिक कामासाठी शासकीय कामासाठी वैयक्तिक कामासाठी जो भी कोण्ही आला असेल तर त्याला तत्काळ मदत केली आहे. मी राजकारण कमी करतो समाजकारण जास्त करतो. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानतो .. देवळा तालुका माझा कुटुंब परिवार आहे तसेच चांदवड व देवळा हे दोन्ही तालुके माझे कुटुंब व परिवार आहेत. या तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीचं सुखदुःख हे माझे आहे. देवळा तालुक्यातील वारकरी परिवाराने वारकरी भवनांची मागणी केली असता 70 लाख रुपयांचे बांधकाम केलेल्या भवनाच्या चाव्या मी त्यांच्या हातात दिल्या. त्याच धर्तीवर चांदवड तालुक्यात सुद्धा एक भवन देण्यात येईल महाराज असे तुमच्या साक्षीने मी सांगतो.ही संस्कृती जपली पाहिजे व ही संस्कृती जपत असताना गरीब श्रीमंत मतभेद मिटला पाहिजे. मी तुमच्या सुखदुःखात सहभागी असेल असे केदा नाना आहेर यांनी यावेळी सांगितले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या