
चांदवड तालुका ओबिसी आरक्षण बचाव समिती स्थापन
चांदवड (प्रतिनिधी ) : – चांदवड तालुक्यातील ओ. बि. सी. समाज घटकांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक चांदवड येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. यावेळी ओ. बि. सी. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन मौर्चाचे नियोजन करण्यात आले. ओ. बि. सी. आरक्षणाला धक्का न लावता इतर समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी चांदवड तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे बैठकीत नियोजन करण्यात आले. यावेळी चांदवड तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची चांदवड तालुका ओबिसी. बचाव समितीची स्थापना करण्यात आली.
या समितीत समता परिषदेचे तालुकाध्यक्ष उत्तम आहेर, जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ आहेर, जिल्हा सेक्रेटरी सतिष सोनवणे, चांदवडचे उपनगराध्यक्ष देविदास शेलार, डॉ. ए. पि. निकम, चांदवडचे माजी सरपंच सुनिल तात्या कबाडे , चांदवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश शेळके, शांताराम गांगुर्डे, सुभाष शेलार, किशोर शेलार, अशोक खैरे, नंदकुमार मंडलिक, दत्तात्रय माळी, संदिप उगले, अल्ताफ तांबोळी, देविदास शेलार . त्र्यंबक सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, दिनकर एळिंजे, सचिन खैरनार, रिझवान घासी , ज्ञानेश्वर पगार, राजाभाऊ ठोंबरे, आनंद बनकर, दौलत माळी, सुदेश खैरे, चद्रंभान साळवे, शरद बोराडे, सुनिल बागुल, गिरीश गांगुर्डे, देविदासशेठ सोनवणे आदींचा या समितीत समावेश आहे.


