कवी वाहरु सोनवणे यांची निसर्ग जाणीव
मराठी कवितेच्या भागात निसर्ग सृष्टीला सौंदर्य पुर्ण नाविन्यता प्राप्त करून दिली आहे त्यात आदिवासी कवितेचीही भर पडली आहे आदिवासी माणूस निसर्गाच्या सान्निध्यात दरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खेडोपाड्यात राहून त्यांनी जंगलातील रहिवासी म्हणुन स्वताला सिध्द केले आहे कवी वाहरु सोनवणे यांनी आपल्या कवितेत आदिवासी , माणूस आणि निसर्ग संस्कृतीचे वर्णन अचुक शब्दांत व्यक्त केले
जीवनाचा शोध घेताना
जीवनाचा शोध घेताना
त्याने एका झोपडीसमोर बसलेल्या
एका आदिवासीला प्रश्र्न केला
या जंगलात तुम्ही कसे जगता
आदिवासी हसला आणि काहीच बोलला नाही .
तेव्हा तो
त्याच्या चेहऱ्याकडे बघतच राहिला त्यात त्याला निसर्गाचे
सौंदर्य दिसले
झाड , फळ खाणाऱ्याला
तू स्त्री की पुरुष विचारत नाही
झाड सावलीत बसणाऱ्याला
त्याची जात विचारत नाही.
झाड, ऑक्सिजन देताना
त्याचा धर्म विचारत नाही.
समानता हेच सूत्र
निसर्गाला भेदभाव माहीत नाही .
विषमतेतून वाट काढत पाणी
समतल महासागर गाठतो
वाराही तसाच वाहतो
जीवनात समतोल गाठतो.
निसर्ग किती सुंदर, किती निर्मळ
सहवासात राहिल
त्याचे आयुष्य सुंदर होईल
निसर्ग संस्कृती , गुलशन बहार
कवी वाहरु सोनवणे यांची ही त्यांच्या रोडाली काव्यसंग्रहातील ही कविता आदिवासी समाजाचे संस्कृतीचे वास्तविक जीवनातील चित्रण साकारणारी आहे
आदिवासी आणि निसर्ग यांचा अतूट संबंध दिसतोय निसर्गाल वृक्षावल्ली त्या सहवासात वावरणारा माणूस ,त्याचा निसर्गातील संसार , डोंगरावरील खळखळून वाहत जाणारे झऱ्याचं पाणी, पावसाळ्यातील हिरवीगार वनराई तीला डोलवणारा अलगद वारा,हे सारे निसर्गातील प्रत्येक घटकांची छाप निसर्गाच्या सान्निध्यात झोपडीत विसावलेल्या माणसाच्या राहणीमानावर पडलेली आहे . आदिवासींच्या जुन्या चालीरीती,रुढी,परंपरा, सर्वांमध्ये निसर्गाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे झाड वेली ह्यांना सखे सोबती मानून जंगली वनस्पती वाचणारा माणूस हा अप्रत्यक्षरित्या वनस्पती,झाडे वेली,पक्षी हितगुज साधतो . जंगलातून मिळणारे फुले ,फळे , कंदमुळे,हा रानमेवा हा आपल्या हक्काचा मानत निसर्गालाच प्रेरणास्थान ठरवले, निसर्ग कोणालाही भेदभाव करीत नाही त्याची निगा राखणं आजही महत्त्वाचे आहे झाड लावा झाड जगवा मोक्ष मिळवा हा संदेश देणारी एक मोहिमच उभारण्यात आली आहे कवी वाहरु सोनवणे यांनी निसर्गातील सांस्कृतिक वैभवशाली घटकांना वरदान मानले.ते काव्यातून अधोरेखित केले आहे
– सुभाष नारायण कामडी
मु वांगण सु पो पळसण ता सुरगाणा
मो नं 9579543308


उत्कृष्ठ समिक्षण