[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुक्‍यातील 53 ग्रामपंचायतींसाठी 1147 अर्ज दाखल

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

शेवटच्या दिवशी ऑनलाइन बरोबरच ऑफलाइन अर्ज स्विकारण्याची पद्धत राबविण्यात आल्याने अर्जांची संख्या वाढली आहे तसेच अनेक उमेदवार शेवटच्या दिवशी अर्ज राहू नये म्हणून धावपळ करताना दिसले

चांदवड तालुक्‍यातील 53 ग्रामपंचायतींसाठी 1147 अर्ज दाखल

चांदवड ( विक्रम देवरे)
चांदवड तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू असून आज बुधवार दिनांक 30 डिसेंबर रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल 1147 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे तालुक्यात आता ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला असून काही ठिकाणी जोरदार लढत अपेक्षित आहेत तर काही ठिकाणी समोरासमोर अर्ज न आल्‍याने तेथे निवडणुका बिनविरोध होतील अंतिम चित्र मात्र माघारी नंतरच कळेल

आज शेवटच्या दिवशी ऑनलाइन बरोबरच ऑफलाइन अर्ज स्विकारण्याची पद्धत राबविण्यात आल्याने अर्जांची संख्या वाढली आहे तसेच अनेक उमेदवार शेवटच्या दिवशी अर्ज राहू नये म्हणून धावपळ करताना दिसले जात पडताळणी ची पावती आणण्यास अनेकांची तारांबळ उडाली ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अर्ज दाखल झाल्याने मावळते वर्ष व येणारे नवीन वर्षाचा पहिला महिना हा ग्रामीण भागात कडाक्याच्या थंडीतही निवडणुकांचा मात्र जोर वाढणार आहे. सर्वठिकाणी पॅनल निर्मीतीसाठी जोराचे प्रयत्न दिसून येत आहे तर काही ठिकाणी निवडणुका बिनविरोध होण्याचे संकेत आहेत अंतिम चित्र मात्र माघारी नंतरच कळेल.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या