मेसनखेडे खुर्द येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

चांदवड ( प्रतिनिधी ) :- चांदवड तालुक्यातील जिल्हा परिषद मेसनखेडे खुर्द येथील शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समता परिषद चांदवड तालुक्याची पदाधिकारी ज्ञानेश्वर भाऊ पगार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
प्रतिमेचे पूजन नाना मार्कंड यांनी केले. दोन मुली सावित्रीबाईंच्या वेशभूषा करून आल्या होत्या. जिल्हा परिषद मुख्याध्यापक सुकदेव बिडगर व सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका एळींजे, संजय ठोंबरे, शरद थोरात, बाबाजी पगार, नितीन पगार, मुकेश सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर माध्यमिक विद्यालय मेसनखेडे खुर्द येथील शाळेमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षक व उपस्थित होते. त्यानंतर मेसनखेडे खुर्द येथे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्व उपस्थितांमध्ये साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन नाना थोरात यांनी केले व अशोक सोनवणे यांनी प्रतिमेचे पूजन केले. यानंतर नगरवस्ती येथील एका विवाह प्रसंगी वधूवरांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

