मराठी साहित्यातील संध्यामग्न कवी __ ग्रेस
आज १० मे मराठी साहित्यातील महत्वाचे कवी माणीक शंकर गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा जन्म दिन त्या निमित्ताने साहित्यकृती बद्दल घेतलेला थोडक्यात आढावा
कवी माणीक गोडघाटे कवी ग्रेस म्हणून साहित्यिकांना परीचीत आहेत त्यांनी प्रमेश्वरी कपा या अर्थाने साहित्यिक नाव धारण केले आहे ते स्वताला ईश्वराचा कवी देखील म्हणत संध्याकाळच्या कविता हा १९६७ मध्ये प्रकाशित झालेला त्यांचा पहिला कविता संग्रह तीथुन त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली त्यामध्ये काव्यसंग्रह
संध्याकाळच्या कविता, राजपुत्र आणि डॉर्लिंग, चंद्र माधवीचे प्रदेश, सांध्यपर्वातील वैष्णवी, सांजभराया साजणी, बाई जोगीया पुरुष
ललित लेखसंग्रह ,
चर्चबेल, मितवा, मृगजळाचे बांधकाम, संध्यामग्न पुरुषांची लक्षणे, वाऱ्याने हलते रान, कावळे उडाले स्वामी, ओल्या वेळुची बासरी
खरेतर कवी ग्रेस हे मराठी साहित्यातील नवकवी बा.सी मर्ढेकर यांच्या नंतर उदयास आलेले दुसऱ्या पीढीतील एक अग्रगण्य कवी त्यांची कवितेतील वैशिष्ट्ये म्हणजे नवलाई आणि आत्मपरता भावात्मक नादलयींच्या अंगाने बहरलेली आहे.मृत्यु आणि एकटेपण ह्यांचे उदास भान आणि त्यातून निर्माण होणारी करुणा हे त्यांच्या कवितेतील मुळ आशयाचे महत्वाचे घटक होत
‘ मी महाकवी दुःखाचा
प्राचिन नदीहुनपरी खोल
दगडाचे माझ्या हातून
वेगाने होते फुलं ,
किंवा
‘ भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तु मज शिकविली गीते,
कविते बद्दल मी माझ्या कवितेचा प्रियकर किंवा पाठीराखा नाही असे म्हणणाऱ्या कवी ग्रेस ह्यांच्या कवितेतील रचना आजही वाचक आणि समिक्षकांना मंत्रमुग्ध करुन विचार करायला भाग पाडते.
या शीवाय कवी ग्रेस यांच्या भावकाव्यात्म निबंधातून कवितेतील अनेक व्यक्तीगत संदर्भ आणि जागा मोकळ्या झाल्यासारख्खा वाटतात निबंधाचे आणि कवितांचे दुवे एकमेकांत मिसळून गेलेले आहेत. त्यांनी अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते आणि साहित्यकृतीला पुरस्कारही मीळाले होते २०११ साली वाऱ्याने हलते रान या ललित निबंधाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या जन्मदिनी सतश प्रणाम
सुभाष नारायण कामडी
मु वांगण सुळे पो पळसण ता सुरगाणा
मोबाईल नं ९५७९५४३३०८

