[masterslider id="2"]
राष्ट्रीय लेख विशेष लेख

आदिवासींच्या आहारात रानटी पालेभाज्यांचा सुगंध

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

आदिवासींच्या आहारात रानटी पालेभाज्यांचा सुगंध…

पुर्वी पासुन निसर्ग पुजक आणि निसर्गाच्या सान्निध्यातच डोंगर, दरीखोरीत, माळरानावर झाप बांधून निसर्गाच्या नियमाच्या आधारित जीवनातील गुजरान करणाऱ्या आदिवासी बांधवांना वनस्पतीसृष्टी बरोबरच जंगलातील इतर जीवनमुल्याचे अधिक दान लाभली आहेत त्यात जंगली रानभाजी हे एक मोठं वरदान ठरले आहे साधारण उन्हाळी आणि पावसाळी या दोन्ही हंगामात निसर्ग देवतेने आदिवासी बांधवांना भरभरून दान केले आहे.

सध्याच्या काळात कोरोनाची भयंकर महामारी पसरली असता बाजारातील भाजीपाल्यांचे दर वाढलेले आहेत त्यामुळे रानभाजीपाल्याने आदिवासी बांधवांना रोजच्या आहारात अधिक दिलासा दिला आहे या भाज्या आदिवासी कुटूंबाना आर्थिक आधार देणाऱ्या ठरतात.निसर्ग उपजत असल्याने आयुर्वेदिकदृष्टया शरीरासाठी अतिशय पौष्टिक ठरतात डोंगराळ भागात,कडेकपारीत, माळरानावर धुंडाळत आदिवासी बांधव भाजीपाला मिळवत असतात. मानवाचे रोजचे अन्न रासायनिक खते व औषधांचा भरमसाठ वापर यामुळे अनेक आजारांचा सामना सामना करावा लागत आहे . यावर्षी लवकर पाऊस झाल्याने रानभाज्या लवकर उगवल्यात डोंगराळ भाग ज्या भागात पाऊस अधिक अशा सर्वत्र जंगलात माळरान परीसरात दिहगड, रान वागाट, मोह टोळंबा ,शेवळी, बोंडारा, कुहरुळा, मोखा, पेंड्रा,ह्या उन्हाळी हंगामातील तर रान तेरा, आकऱ्या,उळसा,करटुल आंबटवेल , कोळु , कांचन , रान ज्योत ,भरडा ह्या भाज्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर येतात सुरगाणा, कळवण, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर ,डांग परिसर,जव्हार, मोखाडा ,ठाणे,पालघर परीसर हा रानभाज्यांनी अधिक फुलून गेला आहे .

-सुभाष नारायण

कामडी मु वांगण सुळे पो पळसण ता सुरगाणा
मोबाईल नं ९५७९५४३३०८

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या