[masterslider id="2"]
मुख्य बातमी राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

… कृत्रिम हाथ बसविला अन स्कुटी चालवू लागला !

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

आचळे येथील दिव्यांग तरुणाने नमोकार तिर्थचे मानले आभार

 

कृत्रिम हाथ बसविला अन स्कुटी चालवू लागला

नोव्हेंबर २०१९ मध्ये संदीप पाटील यांची प्रकृती बिघडली होती म्हणून ते मुकटी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेले होते त्यात त्यावेळी इंजेक्शन देताना डॉक्टरांनी सीरिजमधील हवा न काढता इंजेक्शन दिल्याने त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे त्यांना धुळे व नंतर मुंबई येथे दाखवण्यात आले हाताला ग्यागरीन निदान झाल्याने त्यांना डावा हात काढावा लागला होता

उमराणे वार्ताहर :  नमोकार तीर्थावर मागील महिन्यात झालेल्या कार्यक्रमात आचळे ता जि धुळे येथील रहिवासी संदीप पाटील वय ४५ , यांना साधू वासवानी मिशन पुणे यांच्या सहकार्याने नमोकार तीर्थ चांदवड येथे दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हाथ व पाय बसविण्याच्या कार्यक्रमात डावा हाथ बसविण्यात आला होता
त्यांनी उपक्रम राबविल्याबद्दल नमोकार तीर्थ प्रणेता आचार्य श्री देवनंदजी महाराज व साधू वासवानी मिशन पुणे यांचे आभार म्हणले मानले आहे व शेकडो दिव्यांग लोकांच्या जीवनात जगण्याची उमेद जागवली असे म्हटले आहे
आचार्यश्रीचां जन्ममहोत्सव व
स्वातंत्र्यं दिनानिमित्त तीर्थावर कृत्रिम हात व पाय बसविण्याचे तपासणी शिबिर जुलैमध्ये घेण्यात आले होते ह्यात साडेसातशे लोकांपैकी ४९४ दिव्यांग व्यक्तींना हाथ व पाय बसविण्याचे कार्यक्रम ऑगस्ट महिन्यात दोन दिवस चालला होता
नोव्हेंबर २०१९ मध्ये संदीप पाटील यांची प्रकृती बिघडली होती म्हणून ते मुकटी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेले होते त्यात त्यावेळी इंजेक्शन देताना डॉक्टरांनी सीरिजमधील हवा न काढता इंजेक्शन दिल्याने त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे त्यांना धुळे व नंतर मुंबई येथे दाखवण्यात आले हाताला ग्यागरीन निदान झाल्याने त्यांना डावा हात काढावा लागला दोन वर्षापासून त्यांचा दैनंदिन कार्य बंद झाले होते त्यांनी नमोकार तीर्थ येथे येऊन कृत्रिम हात बसविल्याने आज स्कुटी चालविता येऊ लागली आहे तसेच त्यांचे दैनंदिन कार्य करण्यास मदत झाली आहे त्याबद्दल त्यांनी नमोकार तीर्थ व साधू वासवानी मिशन पुणे यांचे आभार मानले आहे

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या