[masterslider id="2"]
राज्य राष्ट्रीय संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री नेमिनाथ जैन विद्यालयामध्ये २५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा

२५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा

चांदवड : दि.५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री नेमिनाथ जैन विद्यालयांमध्ये प्राचार्य डॉक्टर संगीता राजेंद्र बाफणा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला माजी विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला व आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
जिद्दीने यशाची उंच शिखरे गाठताना अनेकदा आठवतो माणसाला बालपणीचा काळ सुखाचा .त्यातल्या त्यात शाळेतील ते दिवस नेहमीच आठवतात आणि आठवणीने सुद्धा मनाला भुरळ पडते. मन व्याकुळ होतं असाच बाल जीवनातला अर्थात शालेय जीवनातला आठवणींचा जीवनपट उलगडला नेमिनाथ जैन विद्यालयातील 1995 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी तोही 25 वर्षानंतर व ऑनलाईन पद्धतीने………

पंखात शक्ती आली की पक्ष्यांची पिल्ले दूर उडून जातात आपल्या जीवनाच्या वाटा शोधत. तसे ही शालेय जीवन पूर्ण झालेली मुलं जीवनाच्या वाटेवर दूर निघून जातात एकमेकांपासून पण पुन्हा असंच कधीतरी भेटतात ही एकमेकांना पण सर्वांनी एकत्र येणे जुन्या आठवणीत रमण हे आवडते सर्वांना.

याचाच प्रत्यय आला तो माजी विद्यार्थी ऑनलाईन
मेळाव्यात काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेले मित्र-मैत्रिणी सोशल मीडियाद्वारे पुन्हा ऑनलाईन एकत्र आले. नेमिनाथ जैन विद्यालय येथील 1995 च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा रविवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी ऑनलाईन मेळावा चांदवड येथे संपन्न झाला. अनेक विद्यार्थी या ऑनलाईन मेळाव्याला उपस्थित होते. एकमेकांना ऑनलाइन भेटून सर्वांची मन आनंदाने भरून आले .अनेकांनी आपल्या हृदयातील भावनांना मोकळी वाट करून दिली अनेक जण आठवणींच्या महापुरात न्हाऊन निघाले. शाळेत असताना शिकवताना शिक्षकांच्या खास आठवणींनी सर्वांची मन भरून आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील दिवंगत शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली ने झाली.या वेळी बऱ्याच माजी विदयार्थ्यांना गहिवरून आले.स्वागतगीत सौ.चव्हाण मॅडम यांनी सादर केले.त्यांनतर सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचे दर्शन एका छोट्या क्लिप द्वारे घडविण्यात आले.त्यासाठी श्री.सुताने सर,दराडे सर,जैन सर,पाटील सर यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाची प्रस्तावना विद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौ.संगीता बाफना मॅडम यांनी केली.कार्यक्रमात अनिल हिरे,गणेश धाडबळे, जीवन बाफना,ललित फुलफगर,विनोद जाधव,महेश येवले रुपाली पाटील,संदीप देशमाने,रेणुका देवरे,अतुल गोसावी,मनीषा मोहोळकर, जतीन डुंगरवाल, सीमा अहिरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या.रूपक पिंपळगावकर यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून सर्वांची मने जिंकली.कार्यक्रम चालू असतांनाच सर्व माजी विद्यार्थ्यांना घरबसल्या संपूर्ण शाळेचे व संस्थेचे दर्शन श्री.सुताने सरांनी घडविले.सर्वांच्या मनात बालपणीच्या आठ्वणी दाटून आल्यात.त्यावेळी हजर बऱ्याच माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी व विद्यार्थी उत्कर्षासाठी आर्थिक मदत देऊ केली. या ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल अभिजित कुमठेकर यांनी विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. बाफना मॅडम यांना धन्यवाद दिले आभार व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,संकलन श्री.प्रशांत सुताने सरांनी केले.तांत्रिक सहकार्य श्री.संदीप दराडे सर व समीर सुताने यांनी केले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या