
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक,दे.ना. पाटील शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर अण्णा पाटील, कालिकादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील, सचिव प्रताप राव कोठावळे, जि.प.सदस्या ज्योती जाधव, क्रीडा संघटक व मार्गदर्शक अशोक दुधारे,आनंद खरे, दै.गावकरीचे उपसंपादक के.के. अहिरे,भगूर चे नगरसेवक संग्राम करंजकर,शिक्षक नेते शिवाजी निरगुडे,मोहन चकोर या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चांदवड: श्री नेमिनाथ जैन विद्यालयाच्या प्राचार्य डॉ सौ संगीता आर बाफना यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान.
श्री कालिका देवी मंदिर संस्थान व क्रीडा संस्कृती फाउंडेशन नाशिक संस्थानतर्फे दरवर्षी 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील मुख्याध्यापक व शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात येतो.
या वर्षीच्या गुणवंत शिक्षक पुरस्काराने श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य डॉ सौ संगीता आर बाफना यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक,दे.ना. पाटील शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर अण्णा पाटील, कालिकादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील, सचिव प्रताप राव कोठावळे, जि.प.सदस्या ज्योती जाधव, क्रीडा संघटक व मार्गदर्शक अशोक दुधारे,आनंद खरे, दै.गावकरीचे उपसंपादक के.के. अहिरे,भगूर चे नगरसेवक संग्राम करंजकर,शिक्षक नेते शिवाजी निरगुडे,मोहन चकोर या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विद्यालयाच्या प्राचार्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रमच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य श्री.समदडिया एस.यू. पर्यवेक्षक श्री.पवार आर.एम. सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकार्यानी प्राचार्यांचे हार्दिक अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

