पालकमंत्र्यांची धावती भेट

पालकमंत्री छगन भुजबळ साहेब यांचे स्वागत करताना काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक शिवाजी कासव, श्रीहरी ठाकरे, दत्तामामा ठाकरे, सोमनाथ जाधव,बापू शिंदे
चांदवड : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा.छगन भुजबळ साहेब यांचा पाहणी दौरा दरम्यान चांदवड येथे कार्यकर्त्यांची धावती भेट घेण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक शिवाजी कासव यांनी स्वागत केले. उर्धुळ येथील विविध विकासकामांविषयीचे निवेदन देण्यात आले.

तालुक्यातील विविध विकासकामांविषयीचे निवेदन देण्यात आले
यावेळी श्रीहरी ठाकरे, दत्तामामा ठाकरे, सोमनाथ जाधव,बापू शिंदे, जिल्हानेते रघुनाथ अण्णा आहेर, यु के आहेर , सुनीलतात्या कबाडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

