[masterslider id="2"]
मुख्य बातमी राज्य राष्ट्रीय संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

आमदार सुहास आण्णा कांदे यांनी ट्विटरवरून घेतली तक्रारीची दखल

यांनी लिहिलेले राजेंद्र तळेकर

आमदार सुहास आण्णा कांदे यांनी ट्विटरवरून घेतली तक्रारीची दखल

राजेंद्र तळेकर

आमदार सुहास आण्णा कांदे हे सोशल मीडिया वर नेहमी ॲक्टिव्ह असल्याचे बघितले जाते. मनमाड येथील उच्च शिक्षित मोसिन शेख राहणार संत सत्संग नगर, गणेश नगर परिसर मनमाड यांनी ट्विटरवर परिसरात पावसामुळे झालेल्या चिखल दलदलीचे फोटो पोस्ट केले होते आणि आमदारांना लक्ष घालण्यास विनंती केली होती या विनंतीची दखल घेत आण्णांनी त्वरित काम करण्याच्या सूचना केल्या फरहान दादा खान, शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे,रवी खोटरे,प्रफुल्ल शिंदे,निलेश ताठे यांनी त्या भागात मुरूम टाकून नागरिकांना दिलासा दिला. ट्विटरवरून केलेल्या विनंतीची दखल आमदार साहेबांनी त्वरीत घेतली याबद्दल मोसिन शेख यांनी समाधान व्यक्त केले. आमदार सुहास अण्णा कांदे हे आपल्या धडाडीच्या कार्याने मतदार संघातील जनतेत लोकप्रिय झाले आहेत.

आमदारांची टीम नेहमी ग्राउंड लेव्हल ला कार्यरत असते आणि खुद्द आमदार सुद्धा नेहमी नागरिकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या सोडवण्यास भर देत असतात त्याच प्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते आपल्या मतदारसंघाचा आढावा घेत असतात त्याचेच एक उदाहरण म्हणून ट्विटरवरून घेतलेली दखल हे होय.

 

लेखकाबद्दल

राजेंद्र तळेकर

एक टिप्पणी द्या