तळेगावरोहीच्या सरपंच साधनाताई पाटील यांचा दिल्ली येथे पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार
चांदवड : – सरपंच महासंघ व सुदर्शन चैनल व सरपंच माझा चैनल यांच्या संयुक्त विद्यमानाने दिल्ली येथे नोएडा सुदर्शन चैनल यांच्या ऑफिस मध्ये राज्यातील वीस सरपंचांचा कोरना काळात ग्रामपंचायतीने चांगली कामे केल्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला.
यावेळी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री उपस्थित होते.सुदर्शन न्युज चैनल चे सुरेश चव्हाण महासंघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तळेगाव रोही ग्रामपंचायत थेट जनतेतून आलेल्या सरपंच सौ साधना अनिल पाटील यांचा पण गौरव करण्यात आला .यावेळी सरपंच साधना पाटील व अनिल पाटील यांनी सत्कार स्विकारला.

