दरेगावच्या लाल कांद्याला रामेश्वर कृषी मार्केटला मिळाला 3131रूपये भाव
दरेगाव : -चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील प्रगतिशील शेतकरी कौतिक राजाराम जाधव यांनी 7 जुन रोजी कांदा पिकासाठी रोप तयार न करता पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरणी केली होती.
सदर कांदा तयार होऊन काढणी केली असता सोमवारी उमराणे जवळील खारी फाटा येथील रामेश्वर कुषी मार्केट मध्ये कांदे विक्रीसाठी नेले असता या हंगामातील नवीन लाल कांद्याचे स्वागत करण्यात येऊन उद्घाटक करण्यात आले.त्यामुळे दसर्याच्या आधीच बाजारात विक्रीसाठी आलेल्या कांद्याची पाहिणी करण्यासाठी सर्व व्यापारी व शेतकरी यांनी गर्दी केली होती. या नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या कांद्याच्या उद्घाटनासाठी काही काळ अन्य कांद्याचे लिलाव थांबविण्यात आले व नवीन कांद्याचे स्वागत करण्यात आले.यावेळी संगम फार्मर यांनी सर्वोच्च 3131 रूपये बोली लावून खरेदी केली.
सदर कांद्याचे वजन 25 किंव्टल 40किलो इतके भरले. व सुरूवातीलाच खर्च वजा जाता 79हजार 297 रुपये शेतकऱ्याच्या पदरात पडले.

