नांदगाव येथे गोर बंजारा समाज मेळावा संपन्न
नांदगाव- ( राजेंद्र तळेकर ) माजी वन मंत्री संजयजी राठोड आणि नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत नांदगाव येथे गोर बंजारा समाज मेळावा संपन्न झाला.
नांदगाव मतदारसंघातील जवळपास 32 बंजारा तांडा वस्ती वरील समाज बांधव या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारंपरिक वेशभूषा असलेल्या महिला, बंजारा बांधव आणि आमदार सुहास आण्णा कांदे यांनी संजयजी राठोड यांचे स्वागत केले.
या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपल्या बोलीभाषेत मनोगत व्यक्त केले,आमदार संजय राठोड साहेब सतत समाजासाठी कार्य करत असतात,आणि समाज ही पूर्णपणे राठोड साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असे वक्त्यांनी बोलून दाखवले.
माझ्या मतदार संघात मी काम करत असताना 80 टक्के समाजकारणात भर देत असतो आणि सोबत च मी माझ्या समाजासाठी ही होईल ते प्रयत्न करत असतो म्हणूनच महाराष्ट्र भर फिरून माझ्या गोर बंजारा समाजातील माता भगिनी आणि बांधवांशी मी संपर्क साधत आहे,आपल्या अडी अडचणी मी साकार दरबारी मांडू शकतो म्हणून आणि समाजाचा जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणूनही तुमच्याशी बोलायला मी आलो आहे असे आमदार संजय राठोड यांनी बोलून दाखवले सोबतच आमदार सुहास आण्णा कांदे माझे जवळचे मित्र आहेत आणि बंजारा समाजाबद्दल त्यांचे विशेष प्रेम केलेले कार्य कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले,
आमदार सुहास कांदे यांनी आपल्या भाषणात बंजारा समाजाचे आभार मानले,मला निवडून देण्यात बंजारा समाजाचा मोठा वाटा आहे हे मी कधीच विसरू शकणार नाही आणि आपल्यात कधीही अंतर पडू देणार नाही असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला,आजपर्यंत आणि या पुढेही बंजारा समाजाच्या प्रत्येक अडी अडचणी आणि विकासप्रती जनसेवक म्हणून प्रतीबद्द असल्याचे सांगितले.आमदार संजय राठोड हे काही दिवसात पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री व्हावे असे भगवान सेवालाल यांना प्रार्थना करतो असे सांगितले.
मंचावर झालेल्या बहुतेक वक्त्यांनी आमदार संजय राठोड आणि आमदार सुहास कांदे यांना भावी कॅबिनेट मंत्री म्हणून संबोधले…
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या निवासस्थानी स्नेह भोजन झाल्यानंतर आमदार संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेतली यात बोलतांना ते म्हणाले की
हा दौरा माझ्या समाज बंधवांशी संवाद चर्चा म्हणून मी करत आहे जो आधीपासून मी सतत भेट देत असतो,यात कोणताही दुसरा उद्देश्य बसून फक्त माझ्या समाजातील अडी अडचणी समजून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे इतकाच आहे.
व्यासपीठावर माजी वनमंत्री संजय राठोड, आमदार सुहास (अण्णा) कांदे, अंजुम ताई कांदे , विद्या सुनील जगताप, रोहिणी मोरे,नगराध्यक्ष राजेश कवडे, सभापती तेज कवडे, सभापती सुभाष कुटे,विलास आहेर, चित्रपट निर्माता सी.के.पवार,ऑल इंडिया सेवा संघ सचिव डाॅ.राठोड,
हेमराज राठोड, महाराज राठोड, सुदाम राठोड, कांतीलाल चव्हाण,भाऊसाहेब चव्हाण, डॉक्टर प्रकाश चव्हाण, मुलाचंद मोरे,एनके राठोड, गजानन पवार, तात्या राठोड, प्रकाश चव्हाण, प्रल्हाद चव्हाण, प्राध्यापक डिएम राठोड, मोतीलाल राठोड, विष्णू चव्हाण, ईश्वर राठोड, नवनाथ चव्हाण, मिथुन पवार, फत्तू चव्हाण,
सोपान राठोड,समाधान चव्हाण उपस्थित होते

