पंजाबचे काँग्रेसचे मुख्यमंत्री चोवीस तासात विजबिल व पाणीपट्टी माफ करतात. मग चोवीस महिन्यात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचेच उर्जामंत्री असतांना महाराष्ट्रात वेगळा न्याय का ?
चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेरांचा सवाल.
चांदवड : – काँग्रेस पक्षाच्या पंजाबच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांनी पदभार स्वीकारताच पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी विज बिल माफी आणि पाणीपट्टी व पाणी बिल माफी घोषित केली 24 तासांमध्ये पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आणि गेल्या चोवीस महिन्यांमध्ये या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसचे ऊर्जा मंत्री आहेत आणि 24 महिन्यापासून कोरोनाच्या काळामध्ये देखील आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची सक्तीने वीज कपात होते, सक्तीने वीजबिल वसुली होते . मग माझ्यासारख्याला हा प्रश्न पडतो की काँग्रेसचा पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी एक न्याय आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी वेगळा न्याय. हा महाराष्ट्र द्वेष नाहीये का ? माझी मागणी आहे या महविकास आघाडीच्या सरकारकडे की ज्या पद्धतीने काँग्रेसने पंजाबच्या शेतकऱ्यांना वीज बिल माफी आणि पाणीपट्टी माफी केलेली आहेत तसेच तात्काळ या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पण हा न्याय द्यावा आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी पण वीजबिल माफी करावी ही रास्त मागणी मी करतो आहे. असे चांदवड-देवळा विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केली आहे.
बघा काय म्हणाले आमदार डॉ राहुल आहेर..
आमदार डॉ राहुल आहेर
चांदवड देवळा मतदार संघ

