[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दि चांदवड मर्चेटस को-ऑप बँकेची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने संपन्न

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

आण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत मराठा समाजासाठी रुपये १० लाखापर्यंतचे कर्ज योजना सुरु केलेली आहे. नजीकच्या काळात महिलांचे आर्थिक सबलीकरण होण्यासाठी बँकेने महिला बचत गट कर्ज सुरु करण्याबाबत निर्णय घेतला आहे.बँकेने कर्जावरील व्याजदर हे अतिशय माफक ठेवुन बँकेने विविध प्रकारच्या कर्ज योजना तयार केलेल्या आहेत त्याचा सर्व सभासद,ग्राहकांनी लाभ घ्यावा

दि चांदवड मर्चेटस को-ऑप बँकेची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने संपन्न

चांदवड- येथील दि चांदवड मर्चटस को-ऑप बँकेची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष अॅड नरेंद्र धनालाल कासलीवाल यांचे अध्यक्षतेखाली बँकेचे मुख्य कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने रविवार दि. २६/०९/२०२१ रोजी कोविड-१९ चे नियमाचे पालन करुन पार पडली.बँकेचे संस्थापक संचालक भाऊसा श्रीनिवासजी पलोड यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले व त्यानंतर सभेच्या नियोजित कामकाजास सुरवात करण्यात आली.सभेचे सुत्र संचालन संचालक डॉ. संजय कोकणे यांनी केले.बँकेचे सभासद,हितचिंतक इ.दिवंगतांना तसेच कोविड -१९(कोरोना साथीच्या रोगामुळे मृत झालेल्यांना श्रध्दांजली अर्पण करून त्यानंतर बँकेचे अध्यक्ष अॅड नरेंद्र कासलीवाल यांनी मनोगत व्यक्त करताना बँकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत आढावा सादर केला.त्यामध्ये अध्यक्षांनी सभेवर सांगितले की,कोरोना महामारीच्या दरम्यान बँकेने ग्राहकांना लाभ देण्यासाठी विविध प्रकारच्या नविन कर्ज योजना राबविल्या असुन त्याचाच एक भाग म्हणुन किरकोळ व्यावसायिकांना व नोकरदारांना रुपये १ लाखापर्यंतचे विनातारणी कर्ज तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येत आहे.तसेच आण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत मराठा समाजासाठी रुपये १० लाखापर्यंतचे कर्ज योजना सुरु केलेली आहे. नजीकच्या काळात महिलांचे आर्थिक सबलीकरण होण्यासाठी बँकेने महिला बचत गट कर्ज सुरु करण्याबाबत निर्णय घेतला आहे.बँकेने कर्जावरील व्याजदर हे अतिशय माफक ठेवुन बँकेने विविध प्रकारच्या कर्ज योजना तयार केलेल्या आहेत त्याचा सर्व सभासद,ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.त्याचप्रमाणे बँकेने अहवाल सालात १०० कोटी ठेवींचा टप्पा पार केलेला आधुनिक बँकीग प्रणालीचा भाग म्हणुन व गतिमान प्रशासनासाठी बँकेने सभासद,खातेदार व ठेवीदारांसाठी मोबाईल बँकींग,आरटीजीएस व एनईएफटी,तसेच सीटीएस क्लिअरींग सुविधा लाईटबिल,टेलीफोन बिल,डीटीएच रिचार्ज इ.सुविधा सभासद व खातेदारांसाठी उपल्बध करुन दिलेल्या आहेत.तसेच आगामी काळात कॅश डिपॉझिट मशिन,एटीएम,आयएमपीएस इ.सारख्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करुन देणेकामी संचालक मंडळ प्रयत्नशिल आहे असे सांगितले.थकबाकी एनपीए हे बँकेच्या दृष्टीने फार महत्वाचे घटक असुन कर्जदार सभासदांनी वेळेवर कर्ज थकबाकी भरुन बॅकेस सहकार्य करावे तसेच यापुढे कर्जदार व जामीनदार यांनी जागरुक राहून कर्जदार एनपीए होणार नाही याची दक्षता घ्यावी.सभासदांनी कर्ज फेडण्यास सक्षम असलेल्या व्यक्तीसच जामीन रहावे,अयोग्य व्यक्तीच्या कर्जासाठी आपण जामीनदार राहीलात आणि ते कर्ज थकबाकीत गेले तर अशा प्रसंगी त्याची थकबाकी वसुली जामीनदारांकडुन होऊ शकते असे सभेवर सांगितले. यानंतर विषयसुचीचे वाचन मुख्य व्यवस्थापक सचिन सुर्यवंशी यांनी केले.त्याप्रमाणे विषय सुचीनुसार सभेचे कामकाज होऊन विषय पत्रिकेतील विषयानुसार विषय १ ते १३ या सर्व विषयांना सभासदांनी सर्वानुमते मान्यता दिली . त्यामध्ये सभासदांना १० टक्के प्रमाणे लाभांश देण्याचे अध्यक्षांनी सभेवर जाहीर केले.सदर सभेच्या ऑनलाईन कामकाजामध्ये बँकेचे जेष्ठ सभासद शिरीषकुमार कोतवाल यांनी शेतकऱ्यांना मध्य मुदतीचे कर्ज उपलब्ध करुन दयावे अशी सुचना मांडली. त्यास संचालक मंडळाने मान्यता दिली.तसेच रिजवान घासी,प्रकाश शेळके.गोकुळ देवरे,सुर्यकांत ठाकरे,किशोर क्षत्रिय,विज्वल भोसले इत्यादी सभासदांनी समग्र कामकाजात सहभाग घेतला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्ष अॅड नरेंद्र कासलीवाल यांनी समर्पक उत्तरे दिली. विषय सुचीनुसार सभेचे कामकाज झाल्यानंतर व्हा.चेअरमन सचिन खैरनार यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानून आजच्या सभेचे कामकाज संपल्याचे जाहीर केले.यावेळी बँकेचे जेष्ठ संचालक अशोक व्यवहारे,संचालक.राजकुमार संकलेचा,अॅड भुषण पलोड,डॉ.संजय कोकणे,हाजी सादीक अ.सत्तार,अनिल गं.कोतवाल,जाकीर शहा,सुनिल कबाडे,जगन्नाथ राऊत ,सुनिल डुंगरवाल ,महेंद्र कंकरेज ,सुदेश खैरे ,राजेंद्र बिरार,राहुल डुंगरवाल,श्रीमती भारती देशमुख,रेखा शिंदे,नुतन भालके इ.उपस्थित होते.सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभा यशस्वी होणेसाठी बँकेचे मुख्य व्यवस्थापक सचिन सुर्यवंशी,मुख्यशाखा व्यवस्थापक श्री.अनिल सांगळे व वडाळीभोई शाखा प्रमुख परवेज पठाण व सर्व कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या