[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवडला भारत बंदला पाठिंब्यासाठी रास्तारोको

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

• २०२० मधील पिक विमा काढलेल्या नुकसान ग्रस्त चांदवड तालुक्यातील 5331 शेतक -यांना पिक विम्याचा लाभ मिळवुन द्या . मनरेगा कामाचे दिवस व वेतन दुप्पट करा .• वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा . • सार्वजनी आरोग्य व्यवस्थेचा विस्तार करा व लसीकरणाला गती द्या . कोरोणा काळातील विज बिले माफ करा . वरील मागण्यांची दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

चांदवडला भारत बंदला पाठिंब्यासाठी रास्तारोको

चांदवड ( प्रतिनिधी ) , संयुक्त किसान मोर्चाच्या अव्हानाला अनुसरुन दिल्लीतील शेतकरी आंदोलनाल् दि .२६ / ० ९ / २०२१ रोजी १० महिने पुर्ण झाले तरी देखील केंद्र सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे माघे घेतले नाही , गेले १० महिन्यांपासुन लाखो शेतकरी दिल्लीच्या सिमांवर ठाण मांडुन बसले आहे . या लढ्यात ६०० हुन अधिक शेतकरी हुतात्मे झालेले आहे . संयुक्त किसान मोर्चाने मोदी सरकारच्या दिवाळखोर आणि देश बुडव्या धोरणा विरुध्द बंदची हा दिलेली आहे , त्यालाच अनुसरुन आज या ठिकाणी सर्व विरोधी पक्षीयांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे . आंदोलनात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मा.क.प, किसान सभा आदींनी आजच्या या आंदोलनाला अनुसरुन खालील मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ. प्रदिप पाटील यांना दिले.तत्पूर्वी मार्केट कमिटीच्या सेल हाँलमध्ये झालेल्या सभेत तसेच चांदवड- मनमाड रस्ता रोको प्रसंगी भाषणे झाली.त्यात माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नितिन आहेर,शिवसेना तालुकाध्यक्ष विलास भवर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजय जाधव, रेवण ठाकरे, जिल्हा मजुर संघाचे संचालक शिवाजी कासव, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य भिमराव जेजुरे, प्रहारचे गणेश निंबाळकर ,अँड. दत्तात्रय गांगुर्डे,राम बोरसे, भास्कर शिंदे, सुनिता गुंजाळ आदींची भाषणे झाली.

निवेदनात म्हटले आहे की

शेतकरी विरोधी व कार्पोरेट धार्जनी ३ कृषी कायदे व ४ कामगार विरोधी श्रम संहिता रद्द करा . विज दुरुस्ती विधेयक माघे घ्या . . शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत दिट पट हमी भावाचा केंद्रीय कायदा करा पेट्रोल डिझेल गॅसचे भडकलेले दर निम्मे करा . खाजगी करणाद्वारे देश विकने बंद करा . नविन शैक्षणीक धोरण रद्द करा . सोयाबीनचे आयात बंद करा . कांद्याची निर्यात खुली करा .

• २०२० मधील पिक विमा काढलेल्या नुकसान ग्रस्त चांदवड तालुक्यातील 5331 शेतक -यांना पिक विम्याचा लाभ मिळवुन द्या . मनरेगा कामाचे दिवस व वेतन दुप्पट करा .• वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा . • सार्वजनी आरोग्य व्यवस्थेचा विस्तार करा व लसीकरणाला गती द्या . कोरोणा काळातील विज बिले माफ करा . वरील मागण्यांची दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी रस्ता रोको प्रसंगी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. विविध कार्यकत्यांनी भाषणे केली.

यावेळी माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल,.संजय जाधव (तालुका अध्यक्ष काँग्रेस) , नितीन दादा आहेर (शिवसेना उपजिल्हा प्रमुख) विलास भवर (शिवसेना तालुका प्रमुख ,) संपतरावजी वक्टे (किसान सेल अध्यक्ष) .समाधान जामदार (कार्याध्यक्ष तालुका काँग्रेस ) भिमराव जेजुरे,( काँग्रेसचे प्रांतिक सदस्य) श्री.प्रकाश चव्हाण श्री.राम बोरसे श्री.भास्करराव शिंदे , अॅड.श्री.दत्तात्रय गांगुर्डे , जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे ऊत्तमराव ठोंबरे, शिवाजी कासव, खंडेराव सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश शेळके, शिवसेनेचे संदिप उगले, अनिल काळे,सोमनाथ पगार, विजयनाना गांगुर्डे, नंदकुमार कोतवाल, शुंभुराजे खैरे,चंद्रकांत देवरे, खंडेराव सोमवंशी, सुनील ठाकरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र शिंदे,विजय कुंभार्डे,केशव ठाकरे, बापू शिंदे, विश्वनाथ ठोके, अक्षय माकुंणे, भिमराव निरभवणे, घमाजीराजे सोनवणे, जगनदादा खेमणार,गुड्डू खैरणार, श्री.सुकदेव केदारे , किरन डावखर ,शहाजी पाटील, पप्पू कोतवाल, कैलास सावकार, गोरख कोतवाल, धोंडीराम पिंपरकर, गणपत जोंधळे, परशराम केदारे, कमलेश पवार आदी उपस्थित होते. यावेळी. पोलिस निरीक्षक समिर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या