[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

पिडीत शेतकऱ्यांचे पाटबंधारे विभागाचे मंत्री जयंत पाटलांना पत्र

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

“बागायताचे पुरावे देऊनही यंत्रणा हलत नाही. उपविभागीय अधिकारी यांना विचारणा केली असता,उलट माझे घरी पोलीस पाठवले.पोलीसांकडे कोणताही लेखी कागद नव्हता.”
-दगु ठाकरे. शेतकरी , काजीसांगवी

सरकारने जिरायत – बागायताचे निकष सांगावे, पिडीत शेतकऱ्यांचे पाटबंधारे विभागाचे मंत्री जयंत पाटलांना पत्र

दखल न घेतल्यास पुणेगाव कालव्यात उड्या मारणार.

बागायत दराने मोबदला न मिळाल्यास दरसवाडीचे पाणी जाऊ देणार नाही, तसेच कालव्यात उड्या मारुन आत्मदहनाचा इशारा देतांना शेतकरी दगु ठाकरे व इतर

चांदवड ( प्रतिनिधी): – पंधरा वर्षांपासून पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्यात शेतकऱ्यांची जमीन भूसंपादीत झाली. मात्र शासकीय यंत्रणेने योग्य मोबदल्याअभावी शेतकऱ्यांना आजवर झुलवत ठेवले. याचा जाब विचारण्यासाठी काजीसांगवी ता चांदवड येथील पिडीत शेतकऱ्यांनी थेट पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांनाच पत्र पाठविले.
काजीसांगवी येथील दगु ठाकरेसह इतर शेतकऱ्यांच्या जमिनी कालव्यासाठी भूसंपादीत झाल्या.मात्र सदर जमिनी या बागायत असल्याचे सर्व कागदोपत्री पुरावे चांदवड उपविभागीय कार्यालयाला सादर करुनही सबंधित अधिकारी यांनी जिराय

बागायत दराने मोबदला न मिळाल्यास दरसवाडीचे पाणी जाऊ देणार नाही, तसेच कालव्यात उड्या मारुन आत्मदहनाचा इशारा देतांना शेतकरी दगु ठाकरे व इतर

ताचाच शेरा मारला.तसेच फेरसर्वेक्षणासाठी प्रकरणे वर्षानुवर्षे ताटकळत ठेवली जात असल्याने सेवा हमी कायद्याचा भंग होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी प्रांतावर केला.त्यामुळे मोबदला मिळण्यास खुप विलंब झाला आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल न घेतल्यास दरसवाडी कालव्यात उड्या मारुन आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या