[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

लक्ष्मीबाई गणपतराव भालेराव यांचा शतकोत्तर वाढदिवस साजरा

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

लक्ष्मीबाई गणपतराव भालेराव यांचा शतकोत्तर वाढदिवस साजरा

वडनेरभैरव येथे जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी हजेरी लावत अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी दिल्या शुभेच्छा

( विक्रम देवरे )
चांदवड ( प्रतिनिधी): – जुन्याजाणत्या पिढीतील माणसं हे अनुभवाने समृद्ध असतात. हेच अ

नुभव आपल्याला पुढच्या पिढीला मार्गदर्शक म्हणून कार्यरत असतात. जुन्या पिढीतील आई आणि तिचे आपल्यावरती असलेले अनंत उपकार हे कोणतेही मूल्य देऊन आपण परतफेड करू शकत नाही ती म्हणजे जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही मला वाटते आई म्हणजे सागराची विशालता ,पृथ्वीची अमर्यादता म्हणजे आई अशा या अथांग ममतेच्या सागरात अनेक शिंपले आणि मोती सुपुत्र यांच्या रूपाने जगाला मिळत असतात ,असे मत महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी सिताराम झिरवाळ यांनी वडनेर भैरव येथे श्रीमती लक्ष्मीबाई भालेराव यांच्या शतकोत्तर अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना व्यक्त केले. ते कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते .वडनेर भैरव येथील माजी आमदार उत्तमबाबा भालेराव यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई गणपतराव भालेराव यांच्या 104 वयाचा वाढदिवस व शतकोत्तर अभिष्टचिंतन सोहळा, त्याचबरोबर शंभर कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल वडनेभैरव येथे आयोजित करण्यात आलेला होता.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला लक्ष्‍मीबाई भालेराव यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे पुस्तक ‘ ‘ वैभव लक्ष्मी’ चे प्रकाशन मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे , निफाडचे आमदार दिलीपकाका बनकर व मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मविप्र संस्थेचे सरचिटणीस श्रीमती नीलिमा ताई पवार यांच्या हस्ते लक्ष्मी बाई भालेराव यांचा सन्मान करण्यात आला तर नाशिक जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार निलिमाताई पवार ,श्रीराम शेटे, दिलीप काका बनकर , शिरीषभाऊ कोतवाल, नामदार नरहरी झिरवाळ या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भालेराव परिवारातील महिलांनी 104 दीपांनी लक्ष्मीबाई भालेराव यांचे औक्षण केले. विविध मान्यवरांनी लक्ष्मीबाई भालेराव यांच्या आयुष्यभरातील कार्यकर्तुत्वार आपल्या मनोगतातुन प्रकाश टाकला. यावेळी १०४वयाच्या लक्ष्मीबाईंनी व्यासपीठावर गायलेल्या कणखर आवाजातील ‘जात्यावरच्या ओव्या’ सर्वांचे लक्ष वेधून गेल्या. व आजारी असतांनाही या वयात अत्यंत आत्मविश्वासाने गायलेल्या ओव्या सर्वांनाच भाऊन गेल्या.प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, शांताराम तात्या आहेर , सुनील ढिकले, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नितिनदादा आहेर ,कांग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विलास भवर, सतिष मोरे, सुखदेव जाधव ,मनोहर शास्त्री सुकेना, व पिंपळगाव मर्चंटचे चेअरमन किसनलाल ठक्कर ,विजय बाफना ,अशोकशेठ शहा ,मोहनशेठ भंडारी आदी उपस्थित होते. तसेच चांदवड तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, संचालक, मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे संचालक व सभासद, विविध माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष समितीचे सदस्य, कादवा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व सभासद व जिल्ह्यातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
सलादे बाबा कला क्रीडा ट्रस्ट मंडळाच्यावतीने लक्ष्मी बाई भालेराव यांना तैलचित्र मनोहरनाना पाटोळे, राहुल पाचोरकर सुरेश पवार ,दीपक पाचोरकर ,रामचंद्रआप्पा मोरे, यांच्या हस्ते देण्यात आले. आलेल्या मान्यवरांचे स्वागत दौलतनाना भालेराव यांनी केले. प्रास्ताविक म.वि.प्र. समाज शिक्षण संस्थेचे संचालक उत्तमबाबा भालेराव यांनी करीत आईच्या कार्याचा गौरव केला.आईंची आठवण सांगतांनाच कार्यक्रमाच्या चार पाच दिवस अगोदर आईची तब्येत अचानक खालवल्याने उत्तमबाबांचे भाषण चालू असतानांच अश्रु अनावर झाले. यावेळी मविप्र च्या विविध शाळातील संगीत शिक्षक यांनी विविध गीतांचा कार्यक्रम संगीत शिक्षक श्री बाळासाहेब लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला .नाशिक जिल्ह्यातील राजकीय पक्ष ,कार्यकर्ते व भालेराव परिवाराचे स्नेही यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. श्री रावसाहेब भालेराव, श्री रामराव भालेराव ,श्री राजेंद्र भालेराव ,श्री काका भालेराव ,पंचायत समितीचे मा. सभापती श्री अमोल भालेराव, श्री अभिजीत भालेराव या परिवाराने मविप्र संचालक मंडळ ,पिंपळगाव बँक मर्चंट संचालक मंडळ यांचा सत्कार केला याच कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे व नाशिक विभाग साठी निवडून आलेल्या द्राक्ष उत्पादक संचालक ईश्वर महाले, किशोर निफाडे रा,जेंद्र भालेराव यांचा सत्कार भालेराव परिवाराच्या वतीने करण्यात आला .कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या सर्व घटकांनी योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश सलादे, श्रीमती सविता वैद्य, प्राध्यापक दिलीप पवार यांनी केले.

https://youtu.be/GGXWcUO8VsM

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या