[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

तळेगांवरोहीच्या सरपंच साधना पाटील यांचे कालव्यावर गेट बसविण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांना साकडे

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

तळेगांवरोहीच्या सरपंच साधना पाटील यांचे कालव्यावर गेट बसविण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांना साकडे

चांदवड ( प्रतिनिधी) : – चांदवड तालुक्यातील तळेगांव रोही येथे कालव्यावर गेट बसविणे बाबत निवेदन तळेगांव रोहीच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व चांदवड तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साधना अनिल पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयवंतराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ना. पाटील हे चांदवड येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त आले असता सरपंच साधना पाटील यांनी त्यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, तळेगांव रोही ( तालुका चांदवड. जिल्हा नाशिक) येथुन पुणेगांव दरसवाडी डोंगरगांव पोहोच कालवा जात असून सदर कालव्याच्या लाभक्षेत्रातील तळेगांव रोही हे गांव दुष्काळग्रस्त आहे . तळेगांव रोही गावातुन जात असलेला पाट कालव्यातुन पुर पाणी वाहत असते.या वाहुन जाणा – या पाण्याचा परिसरातील शेतक – यांना लाभ होत नाही , तरी तळेगांव रोही बंधारा क्रमांक १ हा पाण्याने भरण्यासाठी या पाटा लगत चारी मारुन गेट बसविण्यात यावे . जेणे करुन परिसरातील शेतक – यांना शेती पिकांसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी लाभ होईल . कालव्यावर गेट बसविण्याचे काम पाटबंधारे विभागाच्या आराखडयात धरण्यात आलेले आहे . तसेच परिसरातील ग्रामस्थांच्या मागणी नुसार बंधारा क्रमांक १ वर गेट बसविण्याच्या कामास मंजुरी मिळणेकामी आपल्यास्तरावरुन संबधित विभागास सुचना व आदेश देण्यात याव्यात हि विनंती आहे .या मागणीचे निवेदन सौ . साधना अनिल पाटील ( चांदवड तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी महीला काँग्रेस) यांनी जलसंपदा मंत्र्यांना दिली आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या