अतिवृष्टीने बाधित शेतकरी बांधवांनी विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार करण्याचे चांदवड तालुका कुषी विभागाचे आवाहन
तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांनी पिक विमा काढला आहे आणि पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे त्यांनी क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाऊनलोड करून आपल्या पिकांची इंटीमेशन कंपनीला देणे आवश्यक आहे,तरी सर्व शेतकरी बांधवांनी क्रॉप इन्शुरन्स या ॲपवरून ऑनलाइन तक्रार करण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी विलास सोनवणे यांनी केले आहे.
अतिवृष्टीने पिकाच्या झालेल्या नुकसानीची तक्रार नोंदवण्यासाठी आपल्या मोबाइल मधील Playstore वर जाऊन Crop Insurance हे App डाउनलोड करावे किंवा खालील लिंक वर जाऊनही आपण हे App डाउनलोड करू शकतात.
https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central
विमा कंपनीकडे ऑनलाइन इंटिमेशन देण्याची कार्यपद्धती अतिशय सोपी असून खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central
Crop Insurance हे App open करावे.
Continue without login – Crop loss – Crop loss intimation – mobile number (आपल्या पीकविमा पावतीवरील फोन नंबर इथे टाकावा ) – आपल्या फोनवर आलेला सहा अंकी OTP अपलोड करावा – फॉर्म मधील माहिती भरावी- फॉर्म submit करावा. पिक विमा कंपनीकडे तक्रार करण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.

