
वडनेर भैरव येथील कुलस्वामिनी जोगेश्वरी माता सलादेबाबा दत्तमंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली .जोगशेलु धुळे येथे उत्तर महाराष्ट्रातील सलादे पाचोरकर ,पानगव्हाणे ,कावळे, रसाल ,वाढवणे ,अमृतकर, शेटे, जाधव ,व्यवहारे ,वसाळ ,जोपळे, कर्डिले, दळवी आदी परिवारांची ही कुलदेवता असलेले जोगेश्वरी माता या देवतेचा कुळ परिवार हा जोगसेलू येथे जाऊन कुलधर्म करीत असतो .परंतु ज्यांना जाणं शक्य होत नाही ,असे परिवार नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव येथील कुलस्वामिनी जोगेश्वरी माता सलादे बाबा दत्त मंदिर येथे शारदीय नवरात्र उत्सव शाळेत साजरा करण्यासाठी व कुळधर्म करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात .शारदीय नवरात्रांत घटस्थापना श्रीपाद प्रिंटिंग प्रेस चे संचालक श्री संदीप साहेबराव जाधव यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली .
यावेळी ग्राम पुरोहित दीपक जोशी यांनी शांतीपाठ त्याबरोबरच श्री स्तोत्र मंत्र उपचारात घटस्थापना विधी पूर्ण केला यावेळी अखिल भारतीय हिंदु रक्षक दल अध्यक्ष दत्ता शिंदे हिंदू रक्षक दल सचिव युवराज सगर सलादे बाबा कला-क्रीडा मंडळाचे संस्थापक सुरेश सलादे द्वारकाधीश चे इंजिनियर शंकरराव साळुंखे डॉक्टर विक्रम सलादे श्री मधुकर पाचोरकर श्री रमेश दादा पाचोरकर श्री राहुल पाचोरकर दीपक पाचोरकर बापूसाहेब पाचोरकर सुरेश पाचोरकर राजेंद्र पाचोरकर आदी उपस्थित होते दररोज सकाळी आरती देवी भजन सायंकाळी मराठी सप्तशती वाचन व सायंकाळी सामुदायिक आरती असा कार्यक्रम दैनंदिन नवरात्रात राबविला जात आहे नाशिक जिल्ह्यातून यासाठी अनेक भाविक दर्शनास येत असतात जोगेश्वरी माता चंडी याग चे आयोजन गुरुवार दिनांक 14 ऑक्टोबर 2019 ला नवमीस करण्यात आलेले आहे


