रायपुरला सौरभ हेअर स्टुडीओचे मा.आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
सौरभ हेअर स्टुडीओचे दिमाखात उद्घाटन माजी आमदार शिरीषकुमार वसंतराव कोतवाल यांच्या शुभहस्ते गुरुवारी चांदवड तालुक्यातील रायपूर येथे ७/१०/२०२५ रोजी घटस्थापना मुहूर्तावर सकाळी १० वाजता करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ह.भ.प शिवाजी महाराज तर
प्रमुख पाहुणे मा . आमदार श्री . शिरीषकुमार कोतवाल व हभ.प. संतोष महाराज आहेर हे होते .
उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमात बोलताना माजी आमदार श्री . कोतवाल यांनी आपल्या मनोगतात ग्रामीण भागात सुरु झालेल्या सौरभ हेअर स्टुडिओचे कौतुक केले. दुकानची रचना बघुन ग्रामीण भागात इतकी सुविधायुक्त सेवा मिळेल याचे आश्चर्य वाटलं. ग्रामीण भागातील तरुणांनी शहराकडे न वळता शहरी भागाततील सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून दिल्या आहेत या विषयी सौरभचे कौतुक केले. केस कर्तनालयाच्या व्यवसायात , स्वच्छता , ग्राहकांशी योग्य वर्तणूक , तसेच जेवढ्या जास्त सुविधा तेवढा जास्त दाम
या न्यायाने काम करण्याचा सल्ला दिला. रायपुर सारख्या भागात लोक केस कापण्यासाठी मनमाड, चांदवड, लासलगाव येथून खास रायपुरला येतील असे नाव कमवा.असा सल्ला दिला.
दुकानातील सोई – सुविधा बघून समाधान व्यक्त केले . यानंतर अध्यक्षीय भाषणात ह.भ.प. शिवाजी महाराज यांनी सौरभला नवीन व्यवसाय सुरू केल्याबद्दल आर्शिवाद दिला . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री . विलास पुंजाबा सोनवणे सर यांनी केले . कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माजी सरपंच संजय कोल्हे सरपंच, निंबाळ्याचे सरपंच नंदु चौधरी , बाळासाहेब गांगुर्डे , सरपंच संजय गुंजाळ, उपसरपंच जालींदर गुजाळ , . सिताराम नामदेव कोल्हे, कारभारी दगु कोल्हे,. कारभारी माधव कोल्हे, पुंडलिक यादव गुंजाळ, सुखदेव दगु कोल्हे, बाळु बाबुराव कोल्हे, . अनिल शिवाजी गुंजाळ, नंदु सखाराम गुंजाळ, मुख्याध्यापक व शिक्षक श्रीराम विद्यालय रायपुर तसेच देवमन पवार, उत्तम देवराम कोल्हे,
देविहास आहेर .बाळासाहेब पवार , कारभारी सखाराम कोल्हे, प्रणव सोनवणे , कावेरी सोनवणे पायल सोनवणे, कन्हैया बिडवे, , अमोल साळुंखे, रोशन जाधव तसेच सर्व नातेवाईक व मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होते .

