चांदवड तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात मिशन ‘कवच-कुंडल’ मोहिम राबविण्यात येणार
कोविड 19 ची तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण शंभर टक्के होण्याच्या हेतुने दि.8 ऑक्टोबर 2021पासून ते 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातमिशन ‘कवच-कुंडल’ मोहिम राबविण्यात येणार आहे.
1)१८ वर्षावरील सर्व नागरिकांचे पहिला डोस व दुसरा डोस, घेऊन १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. 2)तिसरी लाट थोपविणे कामी लसीकरण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. 3)तालुक्यातील आरोग्य विभाग,महसूल विभाग, ग्रामपंचायत, नगरपरिषद,महिला बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन, यांच्या सहकार्याने वरील कालावधीमध्ये सर्व गावांमध्ये लसीकरणाच्या तीन दिवस आधी पूर्व सूचना दवंडी व लाऊड स्पीकर वरून माहिती देण्यात यावी.
4) ग्रामपंचायत आणि नगरपरिषदेने भिंतीवर म्हणी लिहून ,तसेच प्रत्येक गावात विद्यार्थ्यांमार्फत कोरोना नियमावलीचे पालन करून ,रॅलीचे आयोजन ,तसेच लाऊडस्पीकरवरून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. 5)गावातील सर्व लोकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे. तसेच लसीकरणाचे नियोजन गावातील लोकांच्या कामाच्या सोयीने व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले जावे. 6)गाव पातळीवर कोरोना लसीकरणपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत आणि गावातील ग्रामसेवक,तलाठी, शिक्षक,आशा, अंगणवाडी कार्यकर्ती यांनी गावातील कोविड लसीकरण पहिला डोस आणि दुसरा डोस शिल्लक असलेल्या व्यक्तींची यादी तयार करून प्रत्येक गावात त्याप्रमाणे लसीकरणाचे नियोजन करावे. याबाबत गटविकास अधिकारी यांनी सर्व ग्रामपंचायत ला सूचना देऊन गावनिहाय याद्या तयार कराव्या .
7)मुख्याधिकारी यांनी नगरपरिषद कार्यक्षेत्रात वॉर्ड निहाय याद्या तयार करून घेऊन त्याप्रमाणे अगोदर जनजागृती करून 100% लसीकरण पूर्ण करावे. याप्रमाणे या मोहिमेचे स्वरूप असणार आहे. 8)तालुक्यातील उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, मुख्याधिकारी नगरपरिषद, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी हे या मोहिमेचे संनियंत्रण करणार आहेत. अशी माहिती चांदवडचे तहसीलदार प्रदिप पाटील यांनी दिली आहे.

