[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुका महविकास आघाडी व घटक पक्षांची बैठक

सोमवारी 11आक्टोंबरला महाराष्ट्र बंद .बंदला पाठिंब्यासाठी रविवारी चांदवड तालुका महविकास आघाडी व घटक पक्षांची बैठक

उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरी येथे निदर्शने करणार्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप नेत्यांनी गाड्या घातल्या .त्यात शेतकऱ्यांसह आठ लोक मारले गेले या घटनेच्या निषेधार्थ 11आक्टोंबरला महाराष्ट्र बंद पुकारला आहे,
त्या संदर्भात सोमवारी पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कम्युनिस्ट,प्रहार,सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांची रविवारी दु.12 वा. शासकीय विश्रामगृह,गणुर, चौफुली येथे बैठक आयोजित केली आहे तरी सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठकीस हजर रहावे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, न शिवसेना, कम्युनिस्ट पक्ष, प्रहार आदी पक्ष पाठिंबा देणार आहेत. तरी या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संजयजी जाधव (तालुका अध्यक्ष काँग्रेस चांदवड), डॉ. सयाजीराव गायकवाड (तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस) ,  श्री. विलास भवर (तालुका प्रमुख शिवसेना),  श्री. कॉम्रेड हनुमंत गुंजाळ (भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष),  श्री. कॉम्रेड भास्कर शिंदे (कम्युनिस्ट पक्ष),  श्री.प्रकाश चव्हाण (तालुकाध्यक्ष प्रहार) या महाविकास आघाडी व विरोधी पक्षांनी केले आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या