[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

अंडरपास मधील साचलेल्या पाण्यासंदर्भात माननीय नामदार केंद्रीय मंत्री डॉ.भारतीताई पवार यांना निवेदन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुक्यामधील पूर्व भागामध्ये मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्याकारणाने लासलगाव ते मनमाड दरम्यान ची वाकी तळेगाव रोही वडगाव पंगु रापली या गावांमध्ये साधारणता गेट नंबर 106 ते गट नंबर 112 या परिसरामध्ये मागील काळामध्ये रेल्वे प्रशासनाने अंडरपास निर्माण केले आणि कायमस्वरूपी गेट बंद केले त्यामुळे आज अति पावसामुळे अति पावसामुळे जे अंडरपास केलेले आहे

अंडरपास मध्ये पाणी साचल्यामुळे चांदवड तालुक्यातील पुर्व भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला. तत्काळ गेट सुरू करावा व अन्य पर्यायी व्यवस्था करावी या मांगण्यांचे निवेदन सादर

त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेले आहे. मशणरीने पाणी काढले जात आहे तरीही पाणी निघत नाही कारण ते अंडरपास जमिनीपासून खोलवर आहेत तसेच गट नंबर 111 वडगाव पंगु या ठिकाणी पूर्वीपासूनच नैसर्गिक पद्धतीचा अंडरपास असल्याने त्या ठिकाणी अंडरपासच्या आजूबाजूला जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने आज अनेक गावांचा संपर्क त्याठिकाणी तुटलेला आहे चांदवडच्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही व्यक्तीला कातरवाडी, रापली, वडगाव पंगु व तळेगाव रोही या गावांमध्ये जाता येत नाही त्यामुळे तात्काळ एक तर हे बंद असलेले गेट खुले करून द्यावे मागील किंवा कायमस्वरूपी चा अंडरपास व्यतिरिक्त अजूनही वेगळा काही मार्ग करता येईल का व पास याची दखल आज पूर्व भागात अवकाळी पावसाची झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व अंडरपास मधील साचलेल्या पाण्यासंदर्भात ही नागरिकांनी सूचना केल्या व त्याच संधार्भात झालेल्या नुकसानीची ही दखल घ्यावी यासाठीचे निवेदन माननीय नामदार केंद्रीय मंत्री डॉ.भारतीताई पवार यांना तालुक्याचे आमदार डॉ. राहुल दादा आहेर, डॉ.आत्माराम कुंभार्डे, भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, योगेश ढोमसे, सचिन राऊत आदी मान्यवरांनी याठिकाणी निवेदन दिले..!

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या