[masterslider id="2"]
मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुक्यातील पूर्व भागात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानाची तात्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा शैलेश ठाकरे यांची मागणी

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

पूर्व भागात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानाची तात्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकरी बांधवांना मदत मिळावी

चांदवड ( प्रतिनिधी):-चांदवड तालुक्यातील पूर्व भागात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानाची तात्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकरी बांधवांना मदत मिळावी ..अशी मागणी सोनीसांगविचे माजी सरपंच शैलेश ठाकरे यांनी तहसीलदार प्रदिप पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दिनांक ८/१०/२०२१ रोजी सकाळच्या सुमारास चांदवड तालुक्यातील पूर्व भागासह सोनीसांगवी, काजीसांगवी पन्हाळे, विटावे, रेडगाव,वाहेगाव,वाकी बुद्रुक काळखोडे वाकी खुर्द आदी गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाल्याने लागवड केलेला कांदा, कांद्याचे रोप,सोयाबीन मका, ढोबळी मिरची, टमाटे, बाजरी भुईमूग पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी हतबल झाला आहे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून संपूर्ण चांदवड तालुका ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी ,अशी मागणी चांदवडचे तहसीलदार प्रदिप पाटील यांना शैलेश ठाकरे (माजी सरपंच सोनीसांगवी) यांनी निवेदन देऊन केली आहे.

 

व्हिडीओ

https://youtu.be/di8SnkqM1GU

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या