लखीमपुर खेरी घटनेच्या निषेधार्थ सोमवारी चांदवड तालुक्यात बंदचे चांदवड तालुका महविकास आघाडी व घटक पक्षांचे बैठकीनंतर आवाहन
चांदवड तालुका महविकास आघाडी व घटक पक्षांची बैठक चांदवड येथे पार पडली. यावेळी चांदवड शहर तसेच तालुक्यात सोमवारी बंदचे आवाहन करण्यात आले.
उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरी येथे निदर्शने करणार्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप नेत्यांनी गाड्या घातल्या त्यात शेतकऱ्यांसह आठ लोक मारले गेले या घटनेच्या निषेधार्थ 11आक्टोंबरला महाराष्ट्र बंद पुकारला आहे,
त्या संदर्भात सोमवारी पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कम्युनिस्ट,प्रहार,सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांची रविवारी दुपारी शासकीय विश्रामगृह,गणुर, चौफुली येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. बैठकीत अनेक वक्त्यांची बंदच्या नियोजन बाबत भाषणे झाली. तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुचना केल्या.
त्यानंतर सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसह पायी चालत जाऊन रेणुका काँम्पलेक्स व मार्केट यार्ड परिसर तसेच बाजारतळ व गावातील मुख्य बाजारपेठेत जाऊन चांदवड बंद बाबतीत विविध दुकाने, आस्थापना यांना भेटी देऊन बंदमध्ये सहभागी होण्याबाबत आवाहन केले. त्यानंतर चांदवड पोलीस स्थानकात जाऊन बंद संदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस डॉ.सयाजीराव गायकवाड ,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नितिनदादा आहेर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष
संजय जाधव , शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास भवर ,माजी जिल्हा परिषद सदस्य खंडेराव आहेर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी विजयजी जाधंव, सुनिलतात्या कबाडे,समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ अण्णा आहेर, चांदवडचे शिवसेनेचे संदीप उगले, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष समाधान जामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वाघचौरे,कॉम्रेड हनुमंत गुंजाळ ,श्री. कॉम्रेड भास्कर शिंदे श्री.प्रकाश चव्हाण , काँग्रेसचे प्रांतिक सदस्य भिमराव जेजुरे, मजुर संस्थेचे संचालक शिवाजी कासव,समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस सतिष सोनवणे, डॉ.अरुण निकम, समता परिषद तालुकाध्यक्ष यु.के.आहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष पैलवान विजयनाना गांगुर्डे,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव ठोंबरे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चांदवड शहराध्यक्ष प्रकाश शेळके, काँग्रेसचे ओ.बि.सी.सेलचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गिडगे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शैलेश ठाकरे, अनिल पाटील,ईं. रमेश वाघचौरे,संदिप शिंदे, अँड. नवनाथ आहेर, डोणगावचे सरपंच जगदीश शेळके, अँड. दत्तात्रय गांगुर्डे, बाळासाहेब मावळे, तुकाराम सोनवणे,गजानन पगारे, ,अंनवर पठाण,जाईद घासी,अनवर शहा,दतु मामा ठाकरे, दिपांशु जाधव,पपु कोतवाल, कैलास सावकार ,नंदकुमार कोतवाल,बापु शिंदे ,संजय गांधी,किरण आहेर, चेतन चव्हाण, हरी निकम,दिनकर एळिंजे, दत्तु पगार,नाना गोडबोले,केशव पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

