फळे आणि भाज्या आणि व्यावसायिक बागायती पिकांवर संशोधन आणि विकासाचा उपक्रम शेतकऱ्यांपर्यंत नेणे अतिशय महत्त्वपूर्ण आणि स्तुत्य आहे” – आमदार डॉ.राहुल आहेर यांचे प्रतिपादन.

(चांदवड) : आज कृषी क्षेत्रात विविध संशोधन होत आहे. या संशोधनातून शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा होणे गरजेचे आहे. यादृष्टीने भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन चांदवड देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा .डॉ. राहुल आहेर यांनी केले.चांदवड येथील आबड -लोढा-जैन महाविद्यालयात भारतीय कृषी अनुसंधान परिषद संचलित केंद्रीय काढणीनंतर ची अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने तीन दिवसीय कांदा व द्राक्ष या पिकांच्या कापणीनंतर चे व्यवस्थापन या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन केल्यानंतर या कार्यशाळेचे मुख्य समन्वयक आणि भूगोल विभाग प्रमुख डॉ.चांगदेव कुदनर यांनी या कार्यशाळेतच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. अनुसूचित जाती वर्गातील शेतकरी बांधवांसाठी विशेष आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत साठी तीन दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे त्याची सविस्तर माहिती कुदनर यांनी दिली. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एच.जैन त्यांनी आपल्या मनोगतामध्ये या कार्यशाळेचे महत्त्व स्पष्ट केले.भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने महाराष्ट्रात केवळ चांदवड महाविद्यालयाला ही कार्यशाळा मंजूर केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.आज समाज आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या कार्यक्रमांचे आयोजन आवश्यक आहे आणि ते महाविद्यालय करीत असल्याचे ते म्हणाले. माननीय आमदार राहुल आहेर तसेच या या संस्थेचे लुधियाना इथून आलेले शास्त्रज्ञ भूपेंद्र घोडकी योगेश काळनर,आणि कृषिभूषण शिवनाथ बोरसे यांचा सत्कार संस्थेच्या विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष श्री दिनेश भाऊ लोढा, प्रबंध समितीचे सदस्य श्री सुनीलभाऊ चोपडा, विश्वस्त समिती सदस्य आणि चांदवड महाविद्यालय विकास समिती समन्वयक श्री कांतीलालजी बाफणा, प्रबंध समिती सदस्य महाविद्यालय विकास समिती समन्वयक सी.ए.महावीर पारख यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी मान्यवरांचा परिचय अंतर्गत गुणवंत आश्वासन समितीचे समन्वयक मनोज पाटील यांनी करून दिला. मान्यवरांच्या हस्ते या कार्यशाळा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यानंतर उद्घाटन पर मनोगत व्यक्त करताना माननीय आमदार राहुल आहेर यांनी परिषदेच्या कार्याचे कौतुक केले. या कार्यशाळे निमित्ताने आपल्याला देखील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कार्याचा परिचय झाला आणि निश्चित मतदारसंघात शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपक्रम या परिषदेच्या मदतीने महिला आयोजित करता येतील असेही ते म्हणाले. यानंतर महाविद्यालयाच्या वतीने समन्वयक श्री कांतीलालजी बाफणा यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की,” आमची नेमिनाथ संस्थाही विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांवर अधिक भर देत असते. आज या शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परिषदेच्या निमित्ताने परिसरातील शेतकऱ्यांना अधिकाधिक मार्गदर्शन मिळणार असल्यामुळे अशा कार्यक्रमांचे वारंवार आयोजन करण्यासाठी परिषदेने आम्हाला संधी द्यावी.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले समाजाभिमुख शिक्षण या निमित्ताने अमलात येत आहे. असेही ते म्हणाले.भारतीय कृषी अनुसंधान परिषद संचलित केंद्रीय पीक काढणीनंतरचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेचे लुधियाना येथून आलेले शास्त्रज्ञ योगेश काळनर यांनी संस्थेचा परिचय सविस्तरपणे करून दिला.या कार्यशाळेच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना आपणास संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येतील असे ते म्हणाले. लुधियाना येथील संस्थेच्या विविध विभागांचा आणि कार्याचा देखील त्यांनी परिचय करून दिला. यावेळी संस्थेचे संचालक नचिकेत कोतवालीवाले यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.यानंतर चांगदेव कुदनर यांनी राबविलेल्या उन्नत भारत योजनेअंतर्गत नांदूरटेक, राजदेरवाडी, मंगरूळ आणि निमगव्हाण या ग्रामपंचायतीचे अनुक्रमे सरपंच श्रीमती मीरा बाई शिंदे , सिद्धार्थ यशवंते, सौ संगीता वाघ ,सौ रेखा ढोमसे ,सौ.छायाबाई गोधडे या सरपंच भगिनी आणि ग्रामपंचायत सदस्य बांधवांचा देखील सत्कार करण्यात आला. या उन्नत भारत अभियाना अंतर्गत एलईडी त्रेचाळीस इंची स्मार्ट टीव्ही, विद्यार्थ्यांसाठी विविध चार्ट जगाचे नकाशे बाराखडी जादूची पाटी पेन ड्राईव्ह सॉफ्टवेअर देण्यात आले.तपासणीचा मोठा टेबल डॉक्टरांची खुर्ची स्टोर मीटर वजन काटा प्राथमिक उपचार पेटी उंची मापन, एकदा तपासणी यंत्र अशा विविध वैद्यकीय वस्तूदेखील वाटप करण्यात आल्या. याचबरोबर वृक्षारोपणासाठी वडाची ,आवळ्याची विविध प्रकारची झाडे देखील वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर तुषार चांदवडकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.सुदीन दळवे यांनी केले. त्यावेळी दोनशे शेतकरी या परिषदेसाठी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक व कार्यालय वर्ग यांनी सहकार्य केले.

