रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी कवच-कुंडल मोहिम राबवावी पालकमंत्री छगन भुजबळ
येवला (नारायण गुंजाळ) तालुक्यांतील वाढती रूग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी मोहीम स्तरावर जनजागृतीसह ‘कवच-कुंडल’ मोहिमेत लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यात यावी, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. आज येवला व निफाड तालुका कोरोना सद्यस्थिती व उपायोजना आढावा बैठक प्रसंगी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते.
अतिवृष्टीतील नुकसानीचा घेतला आढावा
याबैठकी दरम्यान येवला व निफाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीचा आढावा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला. बाधित शेतकरी, मृत जनावरे, पडझड झालेली घरे यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करून त्याचा अहवाल जिल्हधिकारी कार्यालयास पाठविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत. तसेच पंचनामा करतांना ड्रोन पध्दतीचा वापर प्रामुख्याने करावा, असेही त्यांनी यावेळी सुचित केले.
कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत धनादेशाचे वाटप
यावेळी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या श्रीमती शोभा गणेश बडोदे, येवला, श्रीमती अफसाना इम्रान शेख, येवला, श्री. गंगाधर दगु पोळ, येवला, श्री. सुनिल रमेश गायकवाड, बाभुळगांव, श्री. अण्णसाहेब यादव झाल्टे, अंगुलगांव, श्री. देवराम शंकर माने, महालखेडा चां. यांना कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत प्रत्येकी रुपये 20 हजार धनादेशाचे वाटप पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

