[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

आडगांव रेपाळ येथे नवरात्र उत्सवानिमित्त भवानी माता उत्सव

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ

 

आडगांव रेपाळ येथे नवरात्र उत्सवानिमित्त भवानी माता उत्सव

जागरण गोंधळासह विविध कार्यक्रम

आडगांव रेपाळ ( वार्ताहर ) : – गांव आणि परिसरात नवरात्र उत्सव मोठया उत्साहाने संपन्न होत आहे. नवरात्र उत्सवानिमित्त येथे भवानी मातेचा उत्सव सुरू आहे,

आडगांव रेपाळ: नवरात्र उत्सवानिमित्त भवानी माता मंदिरात होमहवन विधी तथा यज्ञपुजा करतांना मा.सरपंच नारायण गुंजाळ समवेत निवृती ठोंबरे ,गणपत तनपुरे,ज्ञानेश्वर गुंजाळ, रविंद्र निकम,जालींदर मुरकुटे,बाळु तनपुरे ,गोरख जगताप,भास्कर गुंजाळ,भाऊसाहेब महाले, पुरोहीत संतोष देशपांडे ,केदु कवडे, आदी ( छाया : गोरख जगताप)

दररोज देवी मंदिरासमोर जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. यानिमित्त पंचकोशीत प्रसिद्ध असलेले शिवमल्हार भक्त निवृती महाराज गुजरखेडे कर यांनी जागरण गोंधळाचा कार्यक्रम सादर केला. या संगीतमय कथा कार्यक्रमामुळे आडगांव रेपाळ परिसरात चे वातावरण भक्तीमय झाले आहे. या कार्य क्रमात सर्व भाविक तल्लीन झाले होते. या कार्यक्रमाचे समस्त ग्रामस्थांनी आयोजन केले आहे.

दरम्यान नवरात्री च्या संपुर्ण उत्सवात पुढील प्रमाणे जागरण गोंधळाचे कार्यक्रम पार पडले यांत शिवमल्हार वाघे मंडळ आडगांव रेपाळ , सोमनाथ पवार वाघे मंडळ कातरणी, संजय शिंदे वाघे मंडळ मुरमी, साहेबराव हांडे वाघे मंडळ , शिव मल्हार भक्त बाळासाहेब राहींज गणेशनगर यांचे जागरण गोंधळाचे कार्यक्रम पार पडले. उदया मंगळवार दसरा ,होम व आहुती कार्यक्रम नंतर देवीच्या ओव्यांचा कार्यक्रम होऊन समारोप होईल तरी देवी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समस्त ग्रामस्थ आडगांव यांनी केले आहे.

 

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या