[masterslider id="2"]
लेख विशेष लेख हितगुज

वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

ज्ञाती भिरवंटे तेच नैव
दाने नैव संयम याती
विद्या रत्न महाधनम

वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज

जे दान दुसऱ्यापरयंत पोचवल्याने कधी कमी होत नाही जे कधी कोणी चोरुन नेत नाही तेच दानं केल्याने कमी होत नाही तेच दानं म्हणजे विद्या दानं ते निरंतर वाढतच जाते असे रत्न म्हणजे विद्या जे पुस्तकं भरभरुन देत असतात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 15 आक्टोंबर हा दिवस महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो ही तमाम मराठी साहित्यातील वाचक वर्गाला व इथल्या प्रत्येक मराठी माणसापर्यंत अभिमानास्पद बाब आहे वाचन प्रेरणा दिन हा प्रश्न केवळ एका दिवसापुरता मर्यादित नाही तर वर्षांचे 365 दिवस तो जपला पाहिजे ही बाब प्रत्येक क्षणी गांभीर्याने पाहिले पाहिजे हल्ली आजच्या वर्तमान युगात भविष्यकालीन विकासकामांचा आराखडा वाचन संस्कृती ही आँनलाईन पध्दत बनली आहे तीच्याकडे डोळसपणे पाहायला हवे आहे यासाठी मनापासून एक विचार नमुद करावेसे वाटते कि वाचाल तर वाचाल असं एकेकाळी जेष्ठ इतिहासतज्ज्ञ आणि अभ्यासक केशव सिताराम ठाकरे यांनी प्रथम तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उद्देशून म्हणाले होते तीच म्हण पुढे रुढ झाली .
खरे मणुष्य हा समाजशील प्राणी आहे समाजातील प्रत्येक घटकाला सहानुभूतीने विचार करून स्पर्श करून जोपासले आहे त्याची विचाराची दिशा उद्विग्न होऊन न जाता ती निरंतर चालू ठेवली पाहिजे माणूस माणूस माणूस आणि निसर्ग ज्या माणूस निसर्गाच्या सान्निध्यात प्रसन्न वातावरणात रोमहर्षक पध्दतीने संपूर्ण निसर्गाचे वाचन करतो त्याप्रमाणे त्याने वाचनाला महत्व दिले पाहिजे वाचनाने मानसाचे मन हे निसर्गातील फुलांप्रमाणे जसे प्रसन्न होते तसे निरंतर ग्रंथ वाचून प्रसन्न होते यात शंकाच नाही समर्थ रामदास स्वामींनी श्लोकात सांगताहेत कि अखंडीत वाचत जावे विद्यार्थी, तरुण आणि इतर कर्मचारी शिक्षक वर्ग ह्यांनी तर नेहमीच अवांतर वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज बनली पाहिजे शिक्षण ही रचना द्विगुणित करण्यासाठी गोवोगावी जाऊन वाचक वर्ग निर्माण झाला पाहिजे त्यासाठी शाळा, महाविद्यालय, वसतिगृहा बरोबरच खेडोपाड्यात ग्रंथालय व अभ्यासिका सुरू झाली पाहिजे एक महत्वाची गोष्ट म्हणजे 2016 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सातारा जिल्ह्यातील भिल्लार हे पुस्तकांचे पहिले गाव म्हणून घोषित केले ही संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श निर्माण करणारी बाब बनली परंतु त्याचा आदर्श आजच्या वर्तमान युगात तरुण पिढी घडविण्यासाठी आजच्या काळातील क्रियाशील कार्यकर्ते अधिकारी यांनी त्यासंबंधी विचारमंथन करायला हवे कारण अजूनही वाचन संस्कृती ही संपूर्ण खेडोपाड्यात पोहोचलेली नाही नवे वाचक घडविण्याचे काम शाळेपासून सार्वजनिक ग्रंथालयांमधून , आजतरी बंद आहे वाचन संस्कृती मंदावते आहे , आजही युवक साहित्यापासून दूर जात आहे आजही खेड्यात ग्रंथालयाचे प्रश्न सुटले नाही यासाठी शासनाने लक्ष वेधले पाहिजे किमान पदवीपर्यंत शिक्षण समूहाच्या वाटचाली पर्यंत विद्यार्थी जीवन आत्मज्ञानानं भरून उपयोगात आणण्यासाठी विद्यार्थी हा ज्ञान ग्रहण करता शिक्षण बिंदू आहे त्याने वर्गातील अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत वेळ काढून अवांतर वाचनही केलं पाहिजे हे पटवून देणे आजच्या शिक्षणपद्धतीत शिक्षकाची भूमिका पार पाडण्याऱ्या प्रत्येक शिक्षकांचं काम आहे विद्यार्थी तरुण ह्यांनी ते सुयोग्य नियोजन करून भान जपलं पाहिजे तरच वाचन संस्कृती टिकून राहिलं आणि चांगले दिवस येतील यादृष्टीने साहित्य महामंडळाने प्रयत्न केला पाहिजेत आज महाराष्ट्रात महागाईचा दर महिन्याला वाढत आहे दिवसेंदिवस प्रवास भाडे वाढत आहे. राजकारणात कोण कोणावर विश्वास ठेवून मात करतोय ह्या गोष्टीकडे सामान्य माणूस सुध्दा गांभीर्याने पाहत आहे परंतु स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये वेळोवेळी ग्रंथालय, अभ्यासिका, सुरू झाली पाहिजे अशी मागणी जोर धरतांना दिसत नाही अन्नधान्य हे जसं शरीराची भुक भागविण्यासाठी महत्वाचे आहे तसं वाचन हे मनाची एकाग्रता आणि भुक क्षमविण्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे ही विचारसरणी रुढ झाली पाहिजे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी खर्च करून वेळ घालवण्यापेक्षा शासणाचे अनुदान जर मिळत हा निधी खेड्यात वावणाऱ्या विद्यार्थी तरुण हा वाचनाने कमी वयापासूनच सुसंस्कृत होत जाईल त्याचा शहराकडे धाव घेण्याचा लोंढा थांबेल आज महाराष्ट्रात दरवर्षी अखिल भारतीय स्तरावरील किंवा राज्य पातळीवरील छोटी मोठी तीस पस्तीस साहित्य संमेलने आफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने भरवली जातात तीथ मोठ्या प्रमाणावर साहित्यिक विचारवंत लेखक ह्यांची गर्दी होते तीथं पुस्तकांचे डीस्कांऊडवर स्टालही लावले जातात शासणही ती यशस्वी झाली पाहिजे ह्या उद्देशाने थोड्या प्रमाणात खर्च केला जातो परंतु त्याचा उपयोग साहित्यिकांनी तीथ जमलेल्या वाचकप्रेमी रशीकांना कथा, कांदबरी, नाटक, कविता, आत्मचरित्र, ललित गद्य, ह्यांचे आजच्या वर्तमान युगात भविष्यकालीन स्थान आणि जागतिकीकरणाच्या काळात होणारा परिणाम यावर भाष्य केले पाहिजे त्याशिवाय मातृभाषा मराठी ही शुद्ध लिहिली आणि उच्यारली पाहिजे वाचन करत असतानाच शुध्दीकरण झाले पाहिजे खरंतर भाषेच्या माध्यमातून व्याकरण महत्वाचे आहे हेही याची प्रत्येकाने दखल घेतली पाहिजे प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे स्थानिक पातळीवर छोटे मोठे वाड्मयीन उपक्रम सुरू केले तर उद्याचा खेडोपाड्यातील नव युवक आणि महाराष्ट्र हा निश्चितच सुसंस्कृत तथा वाचन, लेखन, चिंतन करणाऱ्या समुदायांचा भाग बनेल याला शंका नाही

सुभाष नारायण कामडी
संशोधक
मो.9579543308

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या