[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

आडगांव रेपाळ परिसरातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतमालाचे सुरू असलेले पंचनामे युध्द पातळीवर पुर्ण करून तात्काळ नुकसान भरपाई द्या- सरपंच सुनिता गुंजाळ

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ
आडगांव रेपाळ परिसरातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतमालाचे सुरू असलेले पंचनामे युध्द पातळीवर पुर्ण करून तात्काळ नुकसान भरपाई द्या- सरपंच सुनिता गुंजाळ

 

आडगांव रेपाळ ( नारायण गुंजाळ ) : – येवला तालुक्यातील उत्तर – पश्चिम भागातील आडगांव रेपाळ परिसरात परतीच्या पावसामुळे मका, सोयाबीन, कांदा, द्राक्ष, भुईमुग आदी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे, या पावसाने होत्याचे नव्हते झाले आहे, तरी नुकसानग्रस्त झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत पंरतु हे पंचनामे युद्ध पातळीवर करून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी सरपंच सुनिता तुकाराम गुंजाळ यांनी एका पत्रकान्वये शासनाकडे केली आहे.

आडगांव रेपाळ :गत महीनाभरापासुन सुरु असलेल्या मुसळधार पावसाने येथील शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले ,दोन एकर मका व सोयाबीन पिकात साचलेले पाणी दाखवितांना शेतकरी नवनाथ निकम समवेत सरपंच तुकाराम गुंजाळ आदी (छाया: नारायण गुंजाळ)

येवला तालुक्यात गेल्या महिनाभर कोसळलेल्या मुसळधार परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे येवला तालुक्यातील आडगांव रेपाळ , मुरमी, निळखेडे, सोमठाणदेश , आंबेगाव, कातरणी , विखरणी, विसापुर, बाळापुर, गुजरखेड , कानडी, ठाणगांव आदी गांवातील खरीपाची मका, सोयाबीन, कांदा, द्राक्ष, भुईमुग,कांदयाचे रोप आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . कापणी केलेल्या मक्याचा चारा पाण्यात भिजल्याने नुकसान झाले आहे त्यामुळे परिसरात जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज पडणाऱ्या पावसाने मक्याच्या बिट्यांना कोंब फुटले आहे, बिट्या काळ्या पडल्या आहेत.महागडे बियाणे घेऊन कांदयाचे रोप टाकले परंतु ते हि पावसाचे पाण्याने पिवळे पडुन खराब झाले.पिकांमध्ये गुडघ्या पर्यंत पाणी साचल्या मुळे पिके शेतातच सडुन गेली आहेत, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावुन घेतला आहे. महागडे बि- बियाणे , रासायनिक खते वापरून मोठी मेहनत घेऊन पिके उभी केली त्यात या पावसाने होत्याचे नव्हते केले त्यातच मक्यावर गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी लष्करी अळीचा हल्ला झाला त्या साठी फवारणी करावी लागली महागडी किटकनाशके वापरली त्यासाठी अतिरिक्त भरमसाठ खर्च झाला. पिके उभे करण्यासाठी कर्ज काढली परंतु या अस्मानी संकटा नी शेतकरी हवालदिल झाला आहे , संकटात सापडला आहे. आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही. झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत परंतु हे पंचनामे युध्द पातळीवर पुर्ण करून नुकसान भरपाई तात्काळ देऊन दिलासा द्यावा अशी मागणी येथील सरपंच सुनिता तुकाराम गुंजाळ, उपसरपंच बाबासाहेब महाले,मा.सरपंच नारायण गुंजाळ , चेअरमन रावसाहेब बढे आदींनी एका पत्रकान्वये केली आहे.

काय म्हणताय शेतकरी .. बघा…

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या