कादवा शिवार ने केलं नवीन प्रेम गीत रिलीज
ग्रामीण भागातील ध्येयवेड्या मुलांनी केलेला आगळा वेगळा प्रयोग म्हणून सर्वत्र कौतुक होत असलेले गाणे आज विजयादशमीच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आले.
जेष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मीठे यांनी लिहिलेल्या गीताला ऋषीकेश शेलार यांच्या आवाजात स्वरबद्ध केले असून , अजूनच बहारदार अन रसिकखेचक झाले आहे.
दिंडोरी तालुक्यातील पालखेड येथील प्रतीक मिठे यांचे दिग्दर्शन असून, त्यांनी आजवर खूप सारे गाण्यांचे प्रयोग केलेले आहेत. कलाकार सलोनी उगले, सचिन बोराडे (येवला), अनंत चौधरी, हेमंत पाटील यांनी अभिनय कौशल्याची चुणूक दाखवली आहे.

