चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हायटेक कार्यालयाचे गुरुवारी उद्घाटन
चांदवड :- चांदवड तालुका व परिसरातील शेतकऱ्यांच्या कुषी उत्पादन विक्री साठी नावजलेली चांदवड कुषी उत्पन्न बाजार समितीचे अत्याधुनिक सुविधांनी युक्त नवीन कार्यालयात लवकरच कामकाज सुरू होत आहे.प्रशस्त अशा नवीन कार्यालयाचे उद्घाटन येत्या गुरुवारी दि. २८ आँक्टोबर रोजी दुपारी चार वाजता संपन्न होत आहे. कार्यालये उद्घाटक केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.भारतीताई पवार यांच्या हस्ते होत आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर हे राहणार आहेत.

चांदवड कुषी उत्पन्न बाजार समितीचे हे नवीन कार्यालय हायटेक असुन प्रशस्त सभापती, उपसभापती व सचिव दालन, प्रशस्त मिटिंग हाँल, बाजार समितीच्या बाजारभावा संदर्भात अपडेट व्यवस्था, अशा अनेक सुविंधानीं युक्त आकर्षक रचना आदी वैशिष्ट्यपूर्ण अशा कार्यालयात बाजार समितीचे कामकाज सुरू होत आहे.कार्यक्रमास चांदवड तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ व शेतकरी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितिन आहेर, सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे,संचालक पंढरीनाथ खताळ, संपतराव वक्ते,निवूत्ती घुले, अण्णासाहेब आहेर, उत्तमबाबा भालेराव, विलासदादा ढोंमसे,श्रीमती कलावती गुंजाळ, सौ.सरस्वती शिंदे, शिरिषकुमार कोतवाल, विक्रम मार्कंड, सौ.पुजा ठाकरे, संजय जाधव, राजेश वानखेडे, प्रविण हेडा, चंद्रकांत व्यवहारे,नितीन उशीर, सौ.ईंदुबाई वाघ,तसेच अधिकारी, कर्मचारी, व्यापारी,व हमाल कुषी उत्पन्न बाजार समिती चांदवड यांनी केले आहे.

