[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

श्री नेमिनाथ जैन विद्यालयात आकाशकंदील बनवा व पणती सजावट कार्यशाळा संपन्न

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

श्री नेमिनाथ जैन विद्यालयात आकाशकंदील बनवा व पणती सजावट कार्यशाळा संपन्न


“कार्यशाळेतून विद्यार्थ्यांनी घेतला नवनिर्मितीचा आनंद”
चांदवड : दरवर्षी प्रमाणे दिवाळीनिमित्ताने बाजारपेठेत निरनिराळे आकाशकंदील आलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या कल्पकता व सृजनशीलतेला चालना मिळावी त्यांच्यातील उद्योजकता कौशल्य वाढीस लागावे यासाठी श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी प्रमाणे कागदकामातून आकाशकंदील तयार करण्याची व मातीच्या पणती सजविण्याची कार्यशाळा ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आली अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ. एस. आर. बाफणा यांनी दिली.
रंगीत कागद, कार्डशीट, मनी, टिकल्या, रंगीबेरंगी पट्टया, बांबूच्या काड्या, कागदी डिश व ग्लास इत्यादी वापरुन कागदकामातुन आपण घरीच आकर्षक आकाशकंदील बनवू शकतो याविषयी मार्गदर्शन करून आकाशकंदील तयार करण्याचे व मातीच्या पणतीला रंगकाम करून त्यावर टिकली, कुंदन, रंगीत पट्टी लावून आकर्षक पणती सजावटीचे प्रात्यक्षिक ऑनलाईन माध्यमातून विद्यालयाचे कलाशिक्षक के. व्ही.अहिरे यांनी केले. विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यानी आकाशकंदील व पणती सजावटीचे फोटो गृपवर पाठवून या उपक्रमात उस्फुर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या कौशल्याने आकर्षक व लहानमोठे आकाशकंदील तयार केले आणि पणती देखील सजवून पर्यावरण पुरक दिवाळीचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ. एस. आर. बाफणा, उपमुख्याध्यापक एस. यु. समदडीया, पर्यवेक्षक आर. एम. पवार, विभागप्रमुख सी. डी. निकुंभ व सर्व शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर सहकारी यांनी कौतुक केले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या