भोयेगाव पंचक्रोशीत ‘शिवनेरी ऍग्रो’चे पदार्पण
भोयेगाव येथे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सेवा पुरवण्यासाठी शिवनेरी ऍग्रो एजन्सीजचे उद्घाटन शुक्रवार दि. २९. १०. २०२१ रोजी होणार आहे. निलेश रघुनाथ जाधव हे या कृषी निविष्ठा विक्रीचे प्रमुख असून रघुनाथ जाधव, जयवंत जाधव, योगेश जाधव, किरण जाधव, मोहन जाधव, ऋषिकेश गाजरे व जालिंदर जाधव यांच्या संकल्पनेने उपक्रम राबविला जात आहे. 
चांदवड तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय दगुजी जाधव व हभप मधुकर महाराज जोपुळकर यांच्या हातून शुक्रवारी उद्घाटन होणार आहे
सर्व कृषी निविष्ठा एकाच दालनात व योग्य दरात उपलब्ध होणार असून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन निलेश जाधव यांनी केले आहे.

