मतदारसंघातील शेतकऱ्यांना भुजबळ साहेबांकडून दिलासा
येवला (नारायण गुंजाळ) तालुक्यातील थकबाकीदार शेतकरी बांधवांचा शेतीपंपाचा विजपुरवठा महावितरण कडुन वीज बिल वसुलीसाठी कट करण्यात येत आहे, पावसाने पुर्ण पीक पाण्यात गेले आसतांनी ,शेतकरी आत्ता कुठे सावरत आला व कांदा बियाणे टाकण्याच्या घाईत आसतांनी कुठलीही पुर्व कल्पना न देता लाईट कट करण्याचा धडाका महावितरणी लावला आहे,या विषयी निवेदन पालकमंत्री भुजबळ साहेब येवला दौऱ्यावर आले असतांना शेतक-यांनी दिले त्याची तातडीने दखल घेत वीजपुरवठा ऐन सणासुदीच्या काळात बंद न करता दिवाळी होईपर्यंत (१० नोव्हेंबर पर्यंत) ट्रान्सफॉर्मर सुरू ठेवावे, व जे ट्रान्सफॉर्मर कट केले असतील ते पूर्ववत सुरू करावे असे आदेश महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री तडवी उपकार्यकारी अभियंता श्री राजेश पाटील व उपकार्यकारी अभियंता श्री इंगळे यांना मा ना श्री भुजबळ साहेबांनी दिले आहे.
दरम्यानच्या काळात थकबाकीदार शेतकरी बांधवांनी आपले विजबिले भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहनही मा भुजबळ साहेबांनी केले.
तरी थकबाकीमुळे गेल्या काही दिवसांपूर्वी ज्या शेतकरी बांधवांचा वीजपुरवठा खंडित केलेला आहे व अद्याप तो पूर्ववत सुरू केला नसेल अशा शेतकरी बांधवांनी ९४२३०५००९९ किंवा ९९६०७६६७७६ या क्रमांकावर व्यक्तिगत संपर्क करावा, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

