[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दरेगाव परिसरात दिवाळीआधिच फुटतायेत फटाके ! मात्र आनंदाचे नव्हे तर दहशतीचे

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

दरेगाव परिसरात दिवाळीआधिच फुटतायेत फटाके ! मात्र आनंदाचे नव्हे तर दहशतीचे

चांदवड : – चांदवड तालुक्यातील दरेगाव परिसरात दिवाळीला अजून काही दिवस बाकी असले तरी त्या आधिच रात्रीच्या वेळी फटाके फुटतायेत.मात्र हे फटाके दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी किंवा एखाद्या सभारंभासाठी नाही तर बिबट्याच्या दहशतीला कंटाळून रात्रीच्या वेळेस आपल्या शेतातील पिकांना पाणी भरण्यासाठी गेलेले शेतकरी बिबटयाच्या भितीने तो जवळ येऊ नये म्हणून हा प्रयत्न करतात. त्यास कारणही तसेच आहे. रात्रीच्या अंधारात पाणी भरण्यासाठी चेस्त्या डोंगरपरिसरात गेलेल्या शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन घडले व.त्याच्या डरकाळीने हातातले फावडे फेकून शेतकऱ्यांनी धुम ठोकत सरळ तत्काळ घराचा रस्ता धरला. सध्या विजेची समस्या निर्माण झाली आहे. काही दिवस दिवसा तर काही दिवस रात्रीची लाईट असते. वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. सध्या पाऊस ही उघडला असल्याने सर्वत्र पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे रात्रीसुध्दा पाणी भरावे लागते. मात्र बिबटयाच्या दहशतीने शेतकऱ्यांमध्ये घबराट आहे. कोणी अँटमबाँम्ब लावतात तर कोणी लवंगी फटाके उडवतात. व त्या आवाजाने तरी बिबट्या जवळ येणार नाही. या खात्रीने रात्रभर समुहाने पिकांना पाणी पुरवठा करतात.

दरेगावजवळील गिरणारे शिवारात बिबट्याने घोडा व शिंगरु फस्त केल्याचे उदाहरण ताजे असतानाच दरेगाव शिवारातील दरेगाव-दुगाव रस्त्याच्या बाजूला असलेल्या आग्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या माळरानावर चरण्यासाठी बाधलेला बैल बिबट्याने हल्ला करून फस्त केल्याचे आढळून आले आहे. या परिसरात लगोपाठ घडलेल्या या घटनांमुळे परिसरातील पशुपालक व शेतकरी वर्गात भितीचे वातावरणात निर्माण झाले आहे. यापूर्वी रात्री अपरात्री गुरे ढोरे बांधुनही कोणतीही अडचण येत नव्हती. तर बिबट्याच्या दहशतीने परिसरात भितीदायक वातावरण निर्माण झाले असून परिसरात पिंजरे लावण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

तत्पूर्वी परिसरात देवळा तालुक्यातील गिरणारे शिवारात व चांदवड तालुक्यातील दरेगाव या गावाजववळील मनमाड-उमराणे या राज्य महामार्गावरिल गिरणारे घाटातुन जाणाऱ्या रस्त्याच्या लगतच गिरणारे शिवारातील शेतावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिथे चरत असलेल्या घोडा व एक शिंगरु यांना जीव गमवावा लागला होता .

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या