आदिवासी भागातील वाघबारस सणाचे वैशिष्ट्य
ग्रामीण आदिवासी भागातील आदिवासी बांधव हे पुर्वीपासून डोंगराळ भागात दरीखोरीत घनदाट अरण्याच्या सानिध्यात लोकवस्तीनं करून तसेच डोंगर माथ्यावर, रानोमाळी झाप बांधून आजही निसर्ग नियमाला अनुसरून विनातक्रारी जीवन जगत आले आहेत. पुर्वीपासून सोबतीला वनस्पती सृष्टी बरोबरच पाळीव प्राणी देखील आहेत गाई, म्हशी, रेडा, बैल, शेळी, कुत्रे, मांजर, याशिवाय कुक्कुटपालन व्यवसायाच्या बरोबरीमानसालाने मोठा गोतावळा सांभाळून जीवन कंठत आहेत मानसाला एखादेवेळी संकट आले तर पाळलेली जीत्राब ही सामोरे जात असतात अशी मनोभावना आहे त्यांची निसर्गा विषयी अपार श्रद्धा आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा ह्या तीनही मुख्य ऋतुमानात येणाऱ्या सहा उप ऋतूत वातावरणात निसर्गनियमानुसार घडवणाऱ्या बदलायला सहानुभूतीपूर्वक जोपासणे गरजेचे आहे त्याबरोबरच पावसाळ्यातील हिरवीगार वनराई तीला अलगद हलवनारी थंडगार हवा अशातच रानात प्राण गुंतवलेल्या या आदिवासी बांधवांवर निसर्गातील प्रत्येक घटकाची छाप पडलेली आहे वर्षातील तीनही ऋतूत रानावनात गुरें ढोरं चारण, तसेच राणभाजी,राण फळं, फुलं,औषधी वनस्पती मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने ह्या निसर्गाच्या सान्निध्यातिल लेकरांना हिंस्त्र श्वापदापासून कोणत्याही परिस्थितीत इजाइ होऊ नये म्हणून गावाच्या नियमानुसार दरवर्षी दिवाळी सणाच्या आधी तीन दिवस अगोदर आश्वीन महिन्यात वसूबारस काही त्याला वाघ बारस म्हटले जाते ह्या सणाची आतुरतेने वाट पाहत निसर्गनियमानुसार घडवणाऱ्या बदलायला संस्कृती संवर्धन करीत रुढी परंपरा चालू ठेवत पुजा केली जाते गावाच्या वेशीवर असणारी गावदेवी, डोंगराळ भागात दरीखोरीत झाडा झुडपात विसावा घेत असलेली स्थानकं ह्यांची दरवर्षी दिवाळी समांतर कोंबडं ,नारळ वाहात श्रध्दा ठेवून पुजा करतात पण वाघ बारस म्हटले तर आदिवासींच्या जीवनात अनेक वेगवेगळ्या प्रकारे हा सण साजरा करतात आज काही ठिकाणी वाघदेव, नागदेव, ह्याच्या दगडी मुर्ती गावातील वेशीवर साकारलेली कलाकृती आहेत तर काही ठिकाणी झाडा झुडपात आश्रयात सेंदूर लाऊन फासलेले दगडी धोंडे आहेत वर्षभर शेतात राबणाऱ्या आदिम बांधवांना काम करत असताना निसर्गाच्या कुशीतील प्रत्येक क्षणी अनेक बारीकसारीक घटनांना सामोरे जावे लागते.मुक्या जीत्राबांना सुरक्षीत राहावी यासाठी वाघ देव,नाग देव ह्यांची दरवर्षी दिवाळी सणाच्या अगोदर श्रध्दा ठेवून ती जागा प्रथम गाईच्या शेणाने सारवून घेत देवाला शेंदूर लावुन पुजा करुन आळाबांधणी केली जाते गावाच्या नियमानुसार प्रत्येक घरातुन त्या दिवशी गावठी कोंबडा ,गुलाल , अगरबत्ती,पाचखादा, नारळ वाहुन मोठ्या भावश्रध्देने पुजा करून वाघ देव, नाग देव, यांच्या नावाने तांदळाच्या दाण्यांच्या पुंजके पाडुन गावदेवीच्या साक्षीने ती कोंबड्यांची रक्ती सांडुन मंत्र विधी म्हणत भगत ती पार पाडतात कि इथून पुढे वन्य प्राण्यांच्या किंवा पायाखाली वावरणाऱ्या हिंस्र श्वापदापासून कोणतीही इजा होणार नाही त्याचे मातीवर ठशे उमटलेले दिसतील पण ते अचानक गावाच्या वेशीवर आले तरी हल्ला करणार नाही किंवा शेती काम करताना , वावरताना त्रास होणार नाही अशी मनोभावे आशा बाळगून काम करतात आणि वर्षभर शेतात,रानात शेतीवाडी सुरक्षीत राहील अशी अशी मनोभावे श्रद्धा आहे. संध्याकाळी दिवस मावळतीला आला की गावातील सर्व जनावरांना एकत्र करून गावातील जेष्ठ नागरिक किंवा जानकार माणसं मुलं मुली ही गावातील मंदिरासमोर किंवा वेशीवरील जागा शेणाने सारवण देत गोमूत्र शींपडून पवित्र करून घेत वाघोबाच्या नावाने आमच्या रानात येशील का अशा अनेक म्हणी म्हणत खेळ करत जनावरांची बोळवणी केली जाते नंतर थोडाफार अंधप्रकाश झाला कि गावातील चार पाच जानकार माणसं घरोघरी जाऊन जनावरांच्या गोठ्यात समोर पणती हे पेटवून गोमूत्र शींपडून गाणी म्हणतात.
दीन दीन दिवाळी
गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कोणाच्या
लक्ष्मणाच्या
कांडण कुंडण केली पुजा
बाळदयाच्या काठीला खळ खळ गुंजा
गाई झाली ढुबा झाला
घरचा धणी हल्का झाला
चावडीत होती निळी घोडी
तेल पैसा खडा खडी
अशी मनोभावे गोठ्यात समोर पणतीच्या आहे की ओवाळून गाणे म्हणत निसर्ग देवतेला वंदन करून जनावरांच्या सुरक्षिततेसाठी घर मालकाच्या नावाने तसेच गुराखी बाळदयाच्या नावाने साक्ष भरतात
माझी गाय हो भिंगर गाय
निळवे रानात चरत जाय
अशी निसर्गाची लोकगीतांतून आविष्कृत सादरीकरण करून सगळे श्रेय निसर्गाच्या सान्निध्यातील प्रत्येक घटकाला देत आळवणी केली जाते तसे पाहिले तर आदिवासी बांधवांना प्रत्येक सण उत्सव हा आरोग्य संपदा, राहणीमान, ही संकल्पना संस्कृती जोपासणे आणि टिकवून ठेवण्यासाठी भाग पाडते यात शंका नाही
- प्रा. सुभाष नारायण कामडी
मो नं 9579543308

