चांदवड तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी पालकमंत्री छगनरावजी भुजबळ यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन
चांदवड ( प्रतिनिधी):-राष्ट्रवादी युवक काँग्रेस , चांदवड तर्फे नामदार छगनरावजी भूजबळ साहेब पालकमंत्री यांना आज नाशिक येथे निवेदन देण्यात आले. त्यात पुर / अतिवृष्टीने बाधीत शेतकरी अनुदानासाठी चांदवड तालुक्याचा समावेश करावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पुर आणि अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . अशा बाधित शेतकऱ्यांना दिलासा म्हणून राज्य सरकारने दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली . त्यात नाशिक जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचाही समावेश आहे . परंतु चांदवड तालुक्याचा समावेश नसल्याने येथील शेतकरी संतप्त झाले आहे . चांदवड तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात घटस्थापना से दसरा या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला . तालुक्यातील ओझरखेड कालव्याला कोणतेही आवर्तन सोडलेले नसताना केवळ ढगफुटी सदुष्य पाऊस झाल्याने वाहेगांवसाळ येथे हा कालवा दोन ठिकाणी फुटला . त्यामुळे या परिसरात पिकांचे प्रचंड नुकसान झाले . ऑक्टोबर महिन्यातील झालेल्या पावसाने सोयाबीन , मका , कांदारापे कांदा इ . पिकांचे नुकसान झाले . त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे . त्यामुळे सरकारने अनुदान वाटपात दुजाभाव न करता ऑक्टोबर महीन्याचाही समावेश करून न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती , या आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ . सयाजीराव गायकवाड ( रा.कॉ. चांदवड तालुकाध्यक्ष ) ,दत्तात्रय वाघचौरे( तालुकाध्यक्ष रा.यु. कॉ . चांदवड ) ,शैलेश ठाकरे ( जिल्हा उपाध्यक्ष ),विक्रम जगताप ( जिल्हा उपाध्यक्ष ), अनिल पाटील ( जिल्हासंघटक ), दिपक शिंदे ( उपाध्यक्ष ), दर्शन घुले ( जिल्ला उपाध्यक्ष ) यांनी निवेदनाद्वारे मागणी केली. ना.भुजबळ यांची नाशिक येथे भेट घेऊन निवेदन दिले .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष रंजनभाऊ ठाकरे हे उपस्थित होते.

