[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

ज्ञानेश्वरीतील सुंदर प्रतिमाने

यांनी लिहिलेले शैलजा जाधव - पाटील

 

ज्ञानेश्वरीतील सुंदर प्रतिमाने

जैसे क्षेत्री जे पेरिजे । ते वाचुनि
आन निपजे । कां पाहिजे तोचि देखिजे।
दर्पाणाधारे ।।

ना तरी कडेया तळवटी । जैसा
आपुलाचि बोलू किरीटी । पडिसादु
होऊनि उठी । निमित्तयोगे ।।

तैसा समस्तां या भजना । मी
साक्षिभूत पै अर्जुना एथ प्रतिफळे
भावना । आपुलाली ।।

जसे शेतजमिनीत जे धान्य
पेरावे त्या वाचून दुसरे उत्पन्नच व्हायचे
नाही. किंवा आरशात जे पहावे तेच
त्यात दृष्टीस पडते.

किंवा अर्जुना , डोंगराच्या कड्याखाली ज्याप्रमाणे आपलाच
बोललेला शब्द काही कारणाने
प्रतिध्वनीच्या रूपाने उमटतो.

त्याप्रमाणे अर्जुना सर्व उपासनांचा मी केवळ साक्षीभूत आहे.
या उपासनेत जशा ज्याच्या भावना
असतील तशा त्या फलद्रुप होतात.

सौ. शैलजा जाधव (पाटील)
चांदवड नासिक

लेखकाबद्दल

शैलजा जाधव - पाटील

एक टिप्पणी द्या