[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

आडगांव रेपाळ येथे गेावत्स पुजन संपन्न : आग्निहोत्र पुजन व वसुबारस उत्साहात

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ

 

आडगांव रेपाळ येथे गेावत्स पुजन संपन्न : आग्निहोत्र पुजन व वसुबारस उत्साहात

.

आडगांव रेपाळ ( वार्ताहर ) : – दिवाळीच्या सणाची सुरूवातच वसूबारस या दिवशी गायवासराची पूजा करून होते.
आपण परंपरेने ही पूजा घरी करीत आलो आहोत.आता लक्षणीय प्रमाणात देशी गाई वासरांची उणीव झाली आहे.माणसाचं पोट आणि जमीनीचा पोत ज्या गाईंमुळे समृद्ध राहतो. त्या गोवंशाचा विसर पडू नये,कृतज्ञता बाळगावी त्यांचं अबाधित महत्त्व पुढच्या पिढीला ज्ञात व्हाव म्हणून आपल्या पूर्वजांनी वसूबारस सुरू केली.
गांव आणि परिसरात दिवाळीच्या उत्सवास आज पासुन सुरुवात झाली असुन प्रतिकात्मक पूजा करण्यासाठी म्हणून पाच देशी गाई वासरासहित
सकाळी ६.४३.३६ सहा वाजून त्रेचाळीस मिनिटे आणि छत्तीस सेकंद या वेळी अग्निहोत्र करून गोवत्सपूजन संपन्न केले. आजच्या दिवाळीच्या पहिल्या वसुबारस निमित्त गाय आणि वासराची पुजा येवल्याचे प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डाॅ.एस. के. पाटील यांचे हस्ते करण्यात आली. यावेळी मंदिरात होमहवन करण्यांत आले. गायी पासुन दुध, दही, तुप तर शेणापासून खत, तसेच अनेक रोगावर मिळणारे औषध यामुळे गाय ही देवता आहे, तेव्हा तीचे पुजन करणे आवश्यक आहे. यावेळी गाय व वासरांची पुजन येथील श्री व सौ. दत्तात्रय बागुल यांनी केले. गोवसंवर्धक प्रकाश जगताप यांनी वसुबारस उत्सवाची माहीती दिली. यावेळी बोलतांना ते म्हणाले कि,आज आपण सर्वांना कोरोनाच्या दहशतीने भेडसावले आहे.रोगप्रतिकारक शक्ती क्षमता हवीच त्याशिवाय आजारांवर मात करता येणार नाही.विषमुक्त शेती घडविल्याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती क्षमता निर्माण होणार नाही. विषमुक्त शेतीसाठी फक्त देशी गाई आणि गोवंश उपयुक्त आहे.
यावेळी कार्यकमांस मा. सरपंच नारायण गुंजाळ,येवला येथील प्रसिद्ध रत्रीरोग तज्ञ डॉ. एस.के.पाटील ,गोसंवर्धक प्रकाश जगताप , ज्ञानेश्वर महाले, दत्तु गायके ,सुरेश बागुल, भास्कर गुंजाळ,
मोठा भाऊ मुरकुटे,बाबासाहेब गायके, भाऊसाहेब निकम,संदिप गायके, भास्कर गायके, महेश महाले, सिताराम निकम, गौतम संसारे, देवचंद संसारे आदी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या