[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

देणेवाडीला अज्ञात व्यक्तीने फवारले कांद्यावर गाजरगवताचे तणनाशक ; शेतकऱ्याचे दीड ते दोन लाखांचे नुकसान

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

बघा प्रत्यक्षात रोपांची अवस्था

https://youtu.be/xIcTrAb7aQE

 


चांदवड : देणेवाडी ( ता . चांदवड ) येथील बळीराम ढगे यांच्या एक एकर कांद्यावर अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी गाजरगवतावर मारले जाणारे तणनाशक औषध फवारल्याने संपूर्ण कांद्याचे नुकसान झाले . यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून कांद्यावर केलेला खर्च वसूल होणार नसल्याने शेतकऱ्याचे दीड ते दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे .  तालुक्यातील देणेवाडी येथील बळीराम ढगे यांच्या गट नंबर १८७ मध्ये लाल कांद्याची एक एकर क्षेत्रात लागवड केली . कांदे लागवड करून साधारणतः तीन महिने झाले होते . या तीन महिन्यांत कांद्यावर शेतकऱ्याने रासायनिक खते , औषधे फवारणी , निंदणी आदींसाठी ६० ते ७० हजार रुपये खर्च केला . एक महिन्यानंतर या कांद्याचे चांगले उत्पादन होईल , अशी अपेक्षा होती . मात्र , मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गाजरगवतावर फवारले जाणारे राउंडअप हे तणनाशक फवारले . यामुळे वार्यावर डोलणारे कांदा रोपे जळून जमीनदोस्त झाली . यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे .

 

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या