चालू रब्बी हंगामासाठी चांदवड तालुक्यात गहू व हरभरा पिकाचे अनुदानित बियाणे परवानाद्वारे उपलब्ध झाले असून तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सदर अनुदानित बियाणे खरेदी करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी केले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत चांदवड तालुक्यासाठी १४२ क्विंटल हरभरा बियाणे व ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत १८० क्विंटल गहू बियाणे परवानाद्वारे अनुदानावर उपलब्ध झालेले आहे.महात्मा फुले कृषि विद्यापीठाने प्रसारित केलेले हरभराचे फुले विक्रम हे वाण विक्रीसाठी उपलब्ध झालेले असून ३०किलो हरभरा बियाण्याची किंमत रुपये २६४०/- असून अनुदान रक्कम रुपये ७५०/-वजा जाता शेतकरी बांधवांना रुपये १८९०/- मध्ये परवानाद्वारे सदर बियाणे मिळणार आहे,तसेच महाबीजचे ४९६ व लोकवन या वाणाचे ४०किलो गहू बियाण्याची किंमत रुपये १४८०/- असुन अनुदान रक्कम रुपये ६४०/- वजा जाता शेतकरी बांधवांना रक्कम रुपये ८४०/- मध्ये परवानाद्वारे सदर बियाणे मिळणार आहे.
चांदवड मधील जाधव अँड कंपनी, धनराज ऍग्रो येथे हरभरा व गहू बियाणे, इंदुमती बहुद्देशीय सेवा संस्था चांदवड येथे गहू बियाणे तसेच वडाळीभोई येथील विकस ऍग्रो व पारेगाव येथील इंदुमती बहुद्देशीय सेवा संस्था येथे सदर अनुदानित गहु बियाणे परवानाद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे. शेतकरी बांधवांनी परवानासाठी मंडळ कृषी अधिकारी चांदवड, दुगाव व वडाळीभोई यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे. मंडळ कृषि अधिकारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
१)श्रीमती जाधव-७९७२८६६१५८
२)श्री.मोकळ-९४२२२२४४९३
३)श्री.भोसले-९४२२३१०३७४

