शालेय शिक्षणातील स्थान आणि विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास यातील शिक्षकाची भूमिका
शिक्षण हे समाजबदलाचे प्रभावी माध्यम आहे लोकशाही व समाजव्यवस्थेत, स्वतंत्र, समता, बंधुता, सामाजिक न्याय, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्र भक्ती हे तत्त्व विद्यार्थी जीवनात रुजविण्यासाठी शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांपर्यंत पहिल्या पासून शिक्षण ह्या साधनाच्या माध्यमातून शिक्षकाने करावयाचे असते. त्यासाठी शिक्षण हे समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोचले पाहिजे भारतीय राज्यघटनेत कलम एकविस नुसार शिक्षण हे प्रत्येक बालकाचा हक्क मानला आहे समाजातील सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण हे मिळाले पाहिजे आणि व्यक्तीमत्व विकास घडवून आणण्यासाठी सहशालेय उपक्रम शाळेत घेतले पाहिजे म्हणून कोणीही कोणत्याही कारणाने वंचित राहू नये असे भारतीय राज्यघटनेत नमुद केले आहे .
हल्ली मागच्या दिड वर्षांपासून भारतात मार्च 2020 पासून कोरोना रोगाच्या या जागतिक माहामारिमध्ये संपूर्ण जग हादरुन गेले तरी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारत सरकारने देखील शर्थीचे प्रयत्न केले आणि चालूही आहेत या रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी दिड वर्षांपासून शाळा, महाविद्यालय , वसतिगृह शासणाला बंद करावी लागली त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणातील अभ्यासक्रमात बांधून ठेवण्यासाठी शासनाच्या नियमानुसार ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्यावे लागले त्याचा विपरीत परिणाम शहरी, आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व विकासासाठी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याशीवाय वाढती महागाई,महामंडळाची एसटी बस यातील प्रवासी वाहतूकीवर परिणाम भाडेवाढ इतर खर्च ह्या बाबतीत आजही सामान्य माणूस बैचेन झाला आहे परंतु आता ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेल्या शाळा महाविद्यालय परिसरात आज विद्यार्थ्यांची नव्याने उपस्थिती झालेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणातील अभ्यासक्रमाबरोच नव्याने सहशालेय उपक्रम हाती घेऊन यशस्वीपणे व्यक्तीमत्व विकासासाठी प्रयत्न करीत राहणे तितकेच महत्त्वाचे आहे शालेय शिक्षणा संदर्भात विचार करण्यासाठी शासणाचा एकच निर्णय असावा 14 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तीमत्व विकास घडवून आणने व त्यांच्या मनामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करणे तसेच कुशल नेतृत्व गुणांचा विकास घडवून आणणं आवश्यक मानले जाते त्यासाठी शासनाने शाळेत वेगवेगळ्या पध्दतीने शालेय उपक्रम राबविण्याची संधी दिली आहे.
21 व्या शतकात शालेय शिक्षण हे द्विध्रुविय प्रक्रिया आहे या प्रक्रियेत विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकसित करण्याचे काम शिक्षक म्हणून अध्यापनाबरोबरच उपक्रमांच्या माध्यमातून करीत असतात शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना कला,क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रात आवड असणे आवश्यक आहे सुप्त गुणांना वाव देणे गरजेचे आहे त्यात गीत, संगीत,नाट्य, चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन,भाषण, वकृत्व स्पर्धा अभिनय, साहित्य निर्मिती इ. समावेश होतो .
तसेच सहशालेय उपक्रमाबरोबरच शालेय स्तरावरील विद्यार्थी समाजाविषयी, राष्टाविषयी जागृत असावे यासाठी पर्यावरण रक्षण, पल्स पोलिओ लसीकरण, आरोग्य विषयक उपक्रमांच्या माध्यमातून संस्कृती संवर्धनासाठी मदत होते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उत्तरदायित्व व राष्ट्रीय एकात्मतेविषयी जबाबदाऱ्यांविषयी जाणीव होत असते त्यातूनच उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे सामर्थ्य असते शिक्षण ही अखंड चालणारी सामाजिक प्रक्रिया आहे. माणूस आपल्या अनुभवातून तसेच औपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून आपला विकास साध्य करीत असतो त्यामुळे शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास असा सुविचार शाळेतील फलकावर आजही लिहलेला झळकताना दिसून येते मग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणते देखील औपचारिक शिक्षणाचे म्हणजेच शाळा, महाविद्यालयाचे कार्य आहे त्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान देऊन न थांबता , विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानात्मक विकास न करता त्याबरोबरच त्याचा भावनिक व शारीरिक, मानसिक विकास घडवून आणणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांंचा बौद्धिक विकास घडवत असतो त्यामुळे त्याच्या शारीरिक व भावनिक विकास साधणे सुध्दा अपरीहार्य ठरते त्यासाठी उपक्रम किंवा कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत उदा सांस्कृतिक, नृत्य प्रकार, स्नेह संमेलने, व्याख्याने या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे आवश्यक असते विद्यार्थी म्हणजे राष्ट्राचे भवितव्य, कर्तव्यदक्ष नागरिक त्यांच्यातच उद्याचे शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, नेता, कलावंत, साहित्यिक हे गुण दडलेले असतात यासाठीच त्यांच्या सुप्त गुणांना संधी उपलब्ध करून देणे गरजेचे असते या सर्व बाबींचा विचार करून शाळेत सहशालेय उपक्रम घेतले जातात परंतु गेल्या अनेक वर्षांपासून शालेय स्तरावरील हे उपक्रम शिक्षण समूहाच्या वाटचालीपासून आजपर्यंत नित्य नियमाने चालु असताना मागच्या दिड वर्ष कालावधीत कोरोना रोगाच्या फैलावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाच्या नियमानुसार शाळा बंद करुन जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी, केंद्र प्रमुख, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी ह्यांनासुध्दा कोरोनावर गावागावांत जन जागृती अभियान राबविण्यासाठी जबाबदारी संपूर्णपणे वेळ देणे भाग पडले त्यामुळे शालेय शिक्षणातील अभ्यासक्रमाबरोबरच शाळेतील कामकाजाचे नियोजन साधनांची कमतरता विद्यार्थ्यांची शिक्षणातील आवड, निवड या सर्वच बाबतीत अडचणी आल्या परंतु आता ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेल्या या शाळांतील विद्यार्थी व्यक्तीमत्व विकासासाठी प्रयत्न केला पाहिजेत त्यासाठी कोरोणाच्या तिसऱ्या लाटे येण्याचा देखील इशारा शासण स्तरावरुन मिळत आहे म्हणून सावध राहून विद्यार्थी व्यक्तीमत्व विकासासाठी येणाऱ्या अडचणी देखील शिक्षकांनी समजून घेत प्रतेक अडचणीचे स्वरूप वेगळे असले तरी विद्यार्थी,पालक यातील दुवा म्हणून शिक्षकाची भूमिका ही महत्त्वाची आहे .
सुभाष नारायण कामडी
संशोधक,
मो नं 9579543308

